न्यूयॉर्क सिटीच्या मोहनगरीचे आकर्षण सर्व जगाला अनेक वर्षांपासून आहे. अमेरिका जेव्हा वसायला सुरुवात झाली तेव्हा जगातल्या कानाकोपर्यातून हजारो लाखो लोक बोटीने या मायानगरीकडे यायचे व समुद्राच्या मध्यभागी एलिस बेटावर हातात मशाल व पुस्तक घेऊन उभा असलेला स्वातंत्र्यदेवतेचा शांत पुतळा पाहिला की, त्यांना सगळ्या श्रमांचे सार्थक झाले असे वाटायचे. आता अमेरिकत बोटीने येण्याऐवजी माणसे विमानाने येतात, पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिला की, त्यांच्या डोळ्यातून आजही पाणी ओघळायला लागते.
पुतळ्याच्या आजूबाजूची दूर देशाहून येणार्या मोठ्या बोटीची आवजाव थांबली असेल, पण छोट्या छोट्या बोटीचा सुळसुळाट मात्र भलताच वाढला आहे. सध्या न्यूयॉर्क व न्यूजर्सीला विभागणार्या हडसन महानदीतून अनेक क्रुझेस चालतात. काही दुपारच्या तर काही रात्रीच्या. दोनतीन तास न्यूयॉर्क शहराच्या कडकडेने हडसन नदीतून प्रवाशांना फिरवत न्यूयॉर्क शहर,शहराच्या मॅनहॅटन , क्वीन्स, ब्रुकलिन, स्टॅटन आयलंड या बेटांना एकमेकांशी जोडणारे अनेक पूल दाखवतात व सरतेशेवटी पुतळ्याच्या खाली बोटी उभ्या राहतात, बोटीतले प्रवासी उत्सुकतेने डेकवर येत पुतळ्याचे, पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर आपले अनेक फोटो काढून घेतात. काही काळ तिथे थांबून बोटी मग पुतळ्याखालून वळतात व आलेल्या बंदरावर परत जातात. पुतळा दिसेनासा होईस्तोपर्यंत बोटीतले प्रवासी त्याचे सौंदर्य अनिमिष नेत्रांनी न्याहाळत असतात. १८८६ साली उभारलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आजही दिमाखात उभा आहे. ९-११ -११ साली अतिरेक्यांनी नामशेष केलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती समोर जळताना दिसत होत्या तेव्हाही तो तसाच उभा होता. फक्त खात्री आहे की, स्वातंत्र्यदेवतेच्या डोळ्यातून तेव्हा आसवे ढळली असतील.
इंग्रजांपासून अमेरिकेला १७७६ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजांचा कट्टर शत्रू असलेल्या फ्रान्स देशामधील काही राजकारणी माणसांनी अमेरिकेला स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा भेट द्यायचे ठरवले. अमेरिकेने पुतळ्याच्या खालचा चबुतरा बनवायचा व फ्रान्सने पुतळा बनवायचा असे ठरले. अंगात पायघोळ झगा , हातात ज्या िर्ंिदवशी स्वातंत्र्य मिळाले ती ४ जुलै १७७६ ही तारीख कोरलेले पुस्तक व स्वातंत्र्याची मशाल अणि पायाशी तुटलेली शृंखला असा रोमन लोकांची स्वातंत्र्यदेवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लिबर्टास देवीचा पुतळा फ्रेडरिक बार्थाल्डी नावाच्या फ्रेच माणसाने बनवायला घेतला. पुतळ्याचे डोके व मशाल घेतलेला हात बनवून झाला, पण तेवढ्यात फ्रान्समधे अत्यंत राजकीय आस्थरता निर्माण झाली. त्यामुळे सगळा पुतळा तिथेच पूर्ण करण्याऐवजी झालेले काम घेऊन बार्थेल्डी अमेरिकेला आला. मशाल घेतलेला हात एका प्रदर्शनात ठेवून उरलेला पुतळा पूर्ण करण्यासाठी त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली, पण अमेरिकन माणसांनी त्याला काही दाद दिली नाही. बार्थोल्डीने पुतळ्याचे डोके पॅरिसमधल्या प्रदर्शनात ठेवले, पण स्वत:च्या देशातही त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी जोसे पुलित्झर या जगप्रसिद्ध अमेरिकन संपादकाने (ज्याच्या नावाचे पुलित्झर परितोषिक उत्कृष्ट पुस्तकासाठी आजही दिले जाते ) स्वत:च्या ‘द वर्ल्ड’ मासिकातून एक लेख लिहून अमेरिकन जनतेकडे पैशांची मागणी केली. त्या लेखाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दीड लाख लोकांनी पैसे दिले. काहींनी हजारो डॉलर्स दिले तर काही लोकांनी एक डॉलरपेक्षा कमी रक्कम दिली ( दोनशे वर्षांपूर्वी तेवढ्याशा रकमेला सोन्याचा भाव होता). तेवढ्याने काम झाले. रक्कम उभी राहिली.पुतळा फ्रान्समध्ये बनवून पुतळ्याचे सुटे सुटे भाग भल्यामोठ्या पेटार्यात घालून ते असंख्य पेटारे अमेरिकेला आणले गेले. चबुतरा न्यूयॉर्कमध्ये स्थानिक लोकांनी बनवला.
बोटीने येता येता बार्थाल्डीला एलिस आयलंड दिसले. पुतळा उभारण्यासाठी ती जागा त्याला अत्यंत योग्य वाटली. कारण न्यूयॉर्क बंदरात येणार्या प्रत्येक बोटीला त्या इवल्याशा बेटावरून यायला लागायचे. शेवटी १८८६ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शंभर वर्षांनी अमेरिकेचे २२ वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलंड याच्या अध्यक्षतेखाली त्या पुतळ्याचे अनावरण झाले. १५१ फूट उंच असलेला हा पुतळा संपूर्णत: तांब्याच्या पत्र्यापासून बनवला गेला आहे. लाल विटांच्या चबुतर्यावर उभा रहिलेला तांब्याचा लाल पुतळा तेव्हा अत्यंत मोहक दिसायचा.अनेक वर्षांच्या उन्हापावसाने मूळचा तांबूस वर्ण आता हिरवट झाला आहे, पण त्या महाकाय पुतळ्याचे सौंदर्य व त्याने अनेक वर्षे दिलेला स्वातंत्र्याचा संदेश मात्र तसूभरही बदललेला नाही
गेल्या शुक्रवारी आम्हाला एका मित्राच्या वाढदिवसासाठी हडसन नदीच्या क्रूझवर आमंत्रित केले होते. सुरेख निरभ्र आकाश असलेली रात्र होती. नदीवरून वाहणारा गार वारा अंगावर शिरशिरी आणत होता. बोटीच्या डेकवर उभे राहताना स्वेटर वा शाल लपेटून घ्यावी लागत होती. खालच्या डायनिंग रूममध्ये भरपेट स्वादिष्ट इटालियन जेवण झालेले होते. छानसा रम केक कापून झाला होता. गप्पा रंगात आल्या होत्या. पाच मिनिटांत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसेल अशी बोटीच्या कॅप्टनने अनाऊन्समेंट केली. हातातले ग्लास घेऊन काही भराभर ,काही अडखळत डेकवर गेले. स्टॅच्यूसमोर बोट उभी राहिली, कप्तानाने इंजिने बद केली. बडबणारी तोंडे शांत झाली. फक्त कॅमेर्याच्या क्लिकचा व बोटीवर आपटणार्या लाटांचा लडिवाळ आवाज ऐकू येत होता. खालून वर सोडलेल्या पिवळसर लाइटमध्ये स्वातंत्र्यदेवतेचा हिरवट पुतळा लाजवाब दिसत होता. आजवर जवळून,लांबून आकाशातून,रस्त्यावरून असंख्य वेळेला पाहिला होता, तरीही तो बघण्याची आतुरता कमी होत नव्हती.
स्वत:कडे आकर्षित करून घ्यायची काय जादुई ताकद असते काही काही शिल्पांमध्ये. दगडविटा, लोखंड, तांबे अशासारख्या निरस गोष्टींपासून बनलेल्या लाखो शिल्पांसारखी ही शिल्पे, पण कसली तरी जादू त्यांना आमूलाग्र बदलून टाकते. जसा ताजमहाल तसाच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. एक प्रेमाचे प्रतीक तर एक स्वातंत्र्याचे. मूळ उद्दिष्टे त्यांना वेगळी जादू देतात का?इतक्या वर्षांची पुटे चढूनही मेंदी रंगावी तशी या शिल्पांची खुमारी रंगतच कशी जाते?
बोट वळली तरी माझे डोळे स्टॅच्यूवरून हलत नव्हते. मान वळवून मी दूरदूर जाणार्या स्वातंत्र्यदेवतेला परत एकदा डोळ्यात साठवून घेत होते

No comments:
Post a Comment