१९७१ च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताच्या नौदलाचा पराक्रम अतुलनीय असा होता. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांची जबरदस्त नाकेबंदी करून कराची बंदराला अक्षरश: भाजून काढले. चितगाव व ढाका पाडले.
त्यानंतरच बांग्लादेशाची निर्मिती झाली. या दिवसातील नौदलाच्या लढाईमध्ये अतुलनीय धाडस, कार्यक्षम कर्तृत्व गाजवून विशिष्ट सेवा मेडल मिळवून सन्मानित केलेले कमांडर विनायक आगाशे यांनी सांगितलेल्या थरारक आठवणी.
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर लादलेले युद्ध १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने जिंकले. हे पंधरा दिवस निर्णायक विजयाची आठवण करून देतात. भारतीय लष्कराच्या विलक्षण समन्वयातून युद्ध निर्णायक ठरले. या पराक्रमातील भारतीय नौदलाचा सिंहाचा वाटा नजरेआड करता येणार नाही. अत्यंत वेगाने आणि फार कमी वेळेत प्रथम बंगालच्या उपसागरात आणि नंतर अरबी समुद्रात आपल्या आरमारी सज्जतेची चुणूक दाखविली गेली. चितगाव पाडण्यात आणि कराचीला घेरण्यात तसेच कित्येक पाक युद्धनौकांना पाणबुड्यांना जलसमाधी देण्यात नौदलाने अतुलनीय साहस दाखविले. या युद्धात सहभागी झालेले कमांडर विनायक आगाशे त्या वेळी आयएनएस विक्रांत, आयएनएस म्हैसूर तसेच पाणबुडीविरोधी विनाशिका कुठारवर विविध जबाबदार्यांवर तैनात होते. पुढील वर्षात त्यांनी ‘वाघली’ आणि ‘वेला’ या पाणबुड्यांचे नेतृत्वही केले.
३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१. अवघे चौदा दिवस. वेगवान घडामोडींनी भारताची तिन्ही सैन्यदले ढवळून निघालेली. युद्धइतिहासात १९७१ चे भारत-पाक युद्ध हे घडामोडींचा विलक्षण वेग, धोरणात्मक व्यूहरचना आणि अतिउत्तम समन्वय या तिन्ही दृष्टींनी अविस्मरण ठरले. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमधल्या श्रेष्ठ दर्जाच्या समन्वयाने आपल्याला विजय मिळवून दिला. हिंदुस्थानी सैन्यानं लष्करी लढाई जिंकण्याचा हा क्षण शेकडो वर्षांनी अवतरला हेाता. जगातील एका महत्त्वपूर्ण खंडाचा राजकीय-भौगोलिक नकाशा बदलून टाकणारे हे निर्णायक युद्ध होते. बांग्लादेशाच्या निर्मितीत हे सारे घडले होते. हा विजय केवळ युद्धातला नव्हता. राजकीय इच्छाशक्तीतून कसे राष्ट्रीय उद्दिष्ट साधले जाऊ शकते आणि संघभावनेतून एखादे युद्ध कसे ‘लाईटनिंग’ ठरू शकते याचा प्रत्यय देणारे हे युद्ध होते.
अशा या युद्धाशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे त्या अभिमानास्पद क्षणांची वारंवार आठवण होते आहे. नौदल अधिकारी म्हणून आयुष्य सार्थकी लागले अशा गौरवाच्या भावना या निमित्ताने दाटून येतात.
१९४७ च्या फाळणीनंतर पूर्व बंगाल हे पूर्व पाकिस्तान बनले. तिथे बंगाली बोलणारी मुस्लीम मंडळी बहुसंख्याक होती. भूभाग ही कसा अगदी छोटा. राजकीय-आर्थिक किंवा अगदी लष्करीदृष्ट्यादेखील विशेष प्रभाव नसलेला. किंबहुना शेकडो किलोमीटर अंतरावरून राज्य करणार्या उर्दू भाषिक पाक राज्यकर्त्यांनी आपल्याकडे सतत दुर्लक्षच केले, या भावनेतून पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात एक अदृश्य तणाव सतत होताच. १९७0 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पूर्व पाकिस्तानात प्राबल्य असलेल्या अवामी लीगला स्पष्ट बहुमत मिळालेले आणि पूर्व पाकचे सार्वभौमत्व ही तर अवामी लीगने निवडणुकांमध्ये व्यक्त केलेली बांधिलकी होती. पश्चिम पाकिस्तानातल्या लष्करी सत्तेला आणि राजकीय पुढार्यांना हे सारे सहन होणारे नव्हते. या संदर्भातल्या वाटाघाटी अपयशी ठरल्यावर अवामी लीगचे नेते मुजीबूर रहमान यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. २५ मार्च १९७१ पश्चिम पाकद्वारे एक क्रूर लष्करी वरवंटा फिरविण्यास सुरुवात झाली. मार्शल लॉ जाहीर करण्यात आला आणि सार्वभौमपणासाठी उभे राहणारे प्रत्येक आंदोलन हरप्रकारे दडपण्याची सुरुवात झाली. परिणाम इतके भीषण होते की, पूर्व पाकिस्तानातून निर्वासित होऊ लागलेले हे असंख्य लोक भारतीय हद्दीत आसरा शोधू लागले. विशेषत: सीमेला लागून असणारे भारतीय जिल्हे या लोंढय़ातून निर्माण होणार्या नव्या ताणतणावांना सामोरे जात होते. हा ताण सर्वव्यापी होता. त्याला सांप्रदायिक, भौगोलिक तणावाची सूज वाढत चालली होती. काही गट बदल्याच्या भावनेनेही पेटले होते. निर्वासितांचा हा आगडोंब भारत सरकारला केवळ डोकेदुखीच ठरला असे नव्हे, तर वेगाने परिस्थिती हाताबाहेर जाते आहे याचे निदर्शक होते.
पूर्व पाकिस्तानातील लष्करी क्रौर्य क्षणोक्षणी वाढत होते. भारताने याबाबत जागतिक मत बनावे या दृष्टीने विविधस्तरांवर हालचाली सुरू केल्या. प. पाकिस्तानच्या धुरंधरांनी ही सर्व अस्वस्थता थांबवून निर्वासितांचे लोंढे आपापल्या जागी परततील, असे वातावरण तयार करावे, प्रभावी पावले उचलावीत यासाठी भारतीय आवाहनाला फारच तोकडा प्रतिसाद मिळाला. पुरेसा जागतिक दबावदेखील वेगाने दिसून येत नव्हता. मात्र, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी जेव्हा ‘पाक’क्रौर्य जगापुढे मांडायला सुरुवात केली तेव्हा कुठे बाह्यजगाला थोडी-थोडी जाग आली. पण निर्वासित परतताहेत असे राजकीय वातावरण तयार करण्यापेक्षा प्रयत्नांनी बरीच दिशा जखमींना मदत, निर्वासितांना काही वस्तू पुरवणे एवढीच जाणवत होती. हळूहळू आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीच्या काही हालचाली घडू लागल्या तरी निर्वासितांचा मूळ प्रश्न अद्याप धगधगतच होता. या दरम्यान काही महत्त्वाच्या तीन घटना घडल्या, ते सांगितले पाहिजे.
महत्त्वाच्या तीन घटना
पहिली घटना म्हणजे, निर्वासितांचे जे गट छावण्यांमध्ये राहत होते त्यांच्या मनात बदल्याची आग धुमसत होती. निर्वासितांच्या बायकांची अब्रू लुटण्याच्या, त्यांची घरे उद्ध्वस्त करण्याच्या घटना पाकिस्तानी सैनिकांकडून सर्रास घडल्या होत्या. निर्वासितांचे हेच गट पुढे मुक्ती वाहिनीचे सैनिक-स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जाऊ लागले. पाकिस्तानी छळवादातून पूर्व बंगालची मुक्तता करणे आणि आपली मायभूमी बांग्लादेश स्वतंत्र म्हणून घोषित करणे, हा त्यांचा उद्देश होता. पूर्व पाकिस्तानात कार्यरत सैनिक आणि लष्करी अधिकारी मूळ पूर्व बंगालचे होते. यातले बरेच जण पाकिस्तानी लष्कराचा पूर्वानुभव घेऊन बाहेर पडलेले किंवा संशयास्पद निष्ठेचे आरोप ठेवून पाकिस्तानी लष्कराने काढून टाकलेलेही होते. तिथल्या नौदलातील अधिकार्यांशी पूर्वपीठिका अशीच काही होती. दोन्ही गट भारताच्या भूभागातून सक्रिय होते. डिसेंबर ७१ पूर्वी काहीकाळ त्यांच्या गनिमी कारवायांमुळे त्या भागातल्या वीजनिर्मिती केंद्राची बर्यापैकी पडझड झाली होती. दूरसंचार यंत्रणा, पूल, बंदरे, जहाज यांचेही नुकसान झाले होते.
दुसरी घटना म्हणजे, पाकिस्तानने हल्ला केलाच तर संभाव्य धोका ओळखून भारताने आपल्या संरक्षणार्थ करावयाच्या कारवाईचेही नियोजन तयार करण्यात आले होते. निर्वासितांनी परतावे म्हणून पूर्व बंगालात काही धडक सशस्त्र कारवाई सुरू करावी काय, याचीही गंभीर चाचपणी चालू होती. पाकिस्तानच्या संरक्षण व्यूहरचनेत पूर्वसीमेपेक्षा पश्चिमेवर आपले खतरनाक अस्तित्व दाखवण्यावर भर होता.
तिसरी घटना ही जास्त लक्षणीय म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरची भौगोलिक-राजकीय समीकरणे किंवा परस्पर संबंधांमधल्या बदलत्या छटा स्पष्ट होत्या. व्हिएतनाममधील गुंता सुटावा म्हणून १९७१ मध्ये चीनशी जवळीक करण्यासाठी अमेरिका पावले उचलीत होता. उएठळड आणि रएअळड मधला एक सदस्य म्हणून पाकिस्तान चीनशी जवळीक साधून होता. आपल्या या जवळकीचा फायदा अमेरिकेने चीनशी जवळीक करण्यासाठी घ्यावा, अशी पाकिस्तानची क्लृप्ती होती. या सक्रियतेचा परिणाम लवकरच दिसून आला. १९७१च्या उत्तरार्धात अमेरिकेने पाकिस्तान धाजिर्णे धोरण स्पष्ट केले. याला प्रतिशह म्हणून ऑगस्ट १९७१ मध्ये भारताने रशियाशी मैत्रीकरार केला. खरेतर १९६९ पासूनच याबाबत चर्चा चालू होती.
या दरम्यान भारतीय संरक्षण क्षितिजावर कोण कोण धुरंधर होते हेही एकदा पाहिले पाहिजे. भारतीय लष्कराची सूत्रे जनरल एसएफजेएफ माणेकशा यांच्याकडे तर नौदलप्रमुख अँडमिरल एस. एम. नंदा आणि हवाईदल प्रमुख होते एअरचीफ मार्शल पी. सी. लाल. तिन्ही दलाच्या समन्वयाची मुख्य जबाबदारी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख म्हणून जनरल माणेकशा यांची होती. नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ‘फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ हेाते अँडमिरल एस. एन. कोल्ही. पूर्व नेव्हल कमांडची जबाबदारी व्हाईस अँडमिरल एन. कृष्णन यांची होती. पूर्वेची व्हाईस अँडमिरल व्ही. ए. कामत यांची प्रत्यक्ष समुद्रातील पश्चिमी नौदल तुकडीचे (फ्लींट) नेतृत्व व्हा. अँडमिरल ई. सी. कुरुविला तर पूर्व तुकडीचे नेतृत्व व्हा. अँडमिरल एस. एच. शर्मा करीत होते.
एप्रिल १९७१. महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठक भरलेली. जनरल माणेकशा यांची विशेष उपस्थिती होती. पूर्वेकडचा बिकट प्रश्न सोडविण्यासाठी युद्धाची गरज पडली तर काय खात्री देऊ शकता? असा सरळ प्रश्न इंदिराजींनी विचारला. माणेकशा यांनी युद्धासाठी स्थिती प्रतिकूल असल्याचे रोखठोक प्रतिपादन केले. ‘एप्रिल जवळपास संपला आहे. मान्सून नजीक येऊन ठेपला आहे. पूर्व पाकिस्तानातल्या नद्या पावसाळ्य़ात महासागराचे उग्र रूप धारण करतात. अशा परिस्थितीत लष्कराची ने-आण आणि युद्धसामग्रीचे दळणवळण अवघड होईल. त्यात महत्त्वाचा वेळदेखील जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आमचे रणगाडे बबिना आणि सिकंदराबाद परिसरात आहेत. बाकीचे सैन्य देशभर पसरलेले आहे. हे सैन्य उत्तरेकडे आणि पूर्व पाकच्या सरहद्दीवर त्वरित हलवावे लागेल. त्यासाठी संपूर्ण रेल्वेमार्ग वापरावे लागतील.’ कॅबिनेटमध्ये उपस्थित कृषिमंत्री फक्रुद्दीन अली अहमद यांच्याकडे वळून माणेकशा म्हणाले, ‘‘सध्या शेतांमध्ये धान्य तयार आहेत. खळ्य़ातले सर्व धान्य बाजारपेठेत पोहोचले नाही तर ते शेतातच खराब होऊन जाईल आणि दुष्काळ पडण्याचे खापर तुम्ही सैन्यावर टाकाल.’’ माणेकशांच्या प्रतिपादनात जरब होती. त्यांनी तिसरी व्यूहात्मक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. ‘आता जर आपण लगेच युद्धाचा निर्णय घेतला तर चारही सरहद्दींवर आपल्याला तैनातीची गरज भासेल. पण आपण नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत थांबलो तर उत्तरसीमेची काळजी कडाक्याची थंडी व गोठलेला हिमालयच घेतील.’ पंतप्रधानांना हे तर्कशुद्ध विवेचन पटले असावे. नोव्हेबर अखेरपर्यंत थांबण्याचा निर्णय झाला. खंबीर आणि निर्णायक शस्त्रक्षेपाच्या तयारीला वेग आला.
इकडे पाकिस्तानची तयारीही अगदीच दुबळी नव्हती. समुद्रपृष्ठावर राहून काम करणार्या जहाजांच्या बाबतीत ते तूल्यबळ तर होतेच, पण ‘पाण्याखालून’ मारा करावयाच्या शस्त्रसज्जतेबाबत ते काकणभर सरसच होते. याचे एक कारण लक्षात घेण्यासारखे आहे. १९६३ मध्ये अमेरिकेने एक पाणबुडी लीजवर पाकिस्तानी नौदलास हस्तांतरित करण्यास मान्यता दिली होती. या मान्यतेनुसार डायाब्लो ही अडीच हजार टनी पाणबुडी अमेरिकन नौदलाने १ जून १९६४ मध्ये पाकिस्तानला दिली. नुसती दिलीच नाही तर देण्यापूर्वी तिला अद्ययावत करून ‘फ्लिट स्नॉरकेल’चा संरचनात्मक दर्जा देण्यात आला. सप्टेंबर १९६४ मध्ये कराचीत तिचे पीएनस गाझी (एसएस ४७९) असे नामकरणही झाले. याचदरम्यान फ्रेंच सरकारने तीन ‘डॅफने’ दर्जाच्या पाणबुड्या पाकिस्तानला देण्यास तत्त्वत: मान्यता जाहीर केली होती. त्यानुसार १ डिसेंबर १९६९ मध्ये पहिली ‘हॅँगर’, दुसरी १२ जानेवारी १९७0 मध्ये ‘शुशुक’ आणि तिसरी ५ ऑगस्ट १९७0 मध्ये ‘मँगरो’ या पाणबुड्या कराचीत दाखल झाल्या. भरीस भर म्हणून पाकिस्तानने आणखी सहा ‘एक्स’क्राफ्ट (मिडगेट पाणबुड्या) आणि सहा चॅरियट्सदेखील घेतल्या. चॅरियट्स लिम्पेट माईन्सनी शस्त्रसज्ज होत्या हे सांगितले पाहिजे. थोडक्यात खुमखुमी स्पष्ट होती.
भारतानेही १९६९-७0 मध्ये प्रशिक्षणासाठी
यू-१२८ या र्जमन बनावटीच्या ‘पाणबुड्या रशियाकडून घेतल्या. कालवेरी, खंदेरी, करंज आणि कुरसुरा अशी नावे त्यांना देण्यात आली. महत्त्वपूर्ण मुंबई बंदराच्या संरक्षणासाठी ८ क्षेपणास्त्र (ट्र२२्र’ी ु३२) सज्ज बोटीही नौदलाने घेतल्या. त्यांचा पल्ला (ील्ल४ि१ल्लूी) खूप कमी होते.
विक्रांतची काळजी
या दरम्यान आपले सर्वात मोठे लढव्वये जहाज आयएमएस विक्रांत हे त्याच्या स्वत:च्या सुरक्षेबाबत संवेदनशील विषय होऊन बसले होते. खरं तर ती एकतीस वर्षे जुनी असल्यामुळे अनेक प्रकारच्या चिंता ‘विक्रांत’ संदर्भात निर्माण झाल्या होत्या. वेगवेगळ्य़ा विश्लेषणातून नौदलाने असा निष्कर्ष काढला होता की, विक्रांतला शत्रूच्या शस्त्रसज्ज पाणबुड्यांचे धोके होते. ‘गाझी’ला बंगालच्या उपसागरात पेरायचे आणि विमानवाहू विक्रांतला जायबंदी करायचे ‘पाक’चा इरादा स्पष्ट होता. ही जोखीम भयंकर होती. या मानबिंदूवर हल्ला किंवा तिला जलसमाधीने भारतीयांचे नीतिधैर्य खचले असते.
अशा वेळी भारतीय नौदलाची रणनिती टोकदार असणे गरजेचे होते. तशी ती आखलीही गेली. दोन्ही पाकिस्तानची संपूर्ण समुद्री नाकेबंदी हे मुख्य ध्येय होते. चितगाव बंदरावर समुद्रातून हल्ला करणे, रॉकबझार, छल्लना, खुलना आणि मोंगला या बंदरांवर हल्ले करणे, बंदरावरील तसेच खोल समुद्रातील पाक नौकांना उद्ध्वस्त करणे, महत्त्वाच्या लक्ष्यांवर एकाचवेळी हल्ले करणे, अशी ही रणनीती होती. रियल अँम्पी वियस लँडिंग हेदेखील एक विशेष उद्दिष्ट होतेच. सिलोनच्या (आता श्रीलंका) दक्षिणेकडून प. पाकिस्तानच्या व्यापारी तसेच संरक्षण जहाजांवर हल्ले करतानाच त्या देशाच्या सामुद्रिक सज्जतेविषयी महत्त्वाची माहिती भारतीय नौदलास पुरविणे हीदेखील नौदलाची जबाबदारी होती. जुनी ‘मगर’ आणि तिच्या जोडीला नव्या ‘गुलदार’ आणि ‘घडीयाल’ या तीन युद्धबोटीही सज्ज करण्यात आल्या. सामुद्रिक हल्ल्याकरिता जनरल सपोर्ट ड्यूटी हे त्यांचे काम होते व पाकची बंदरे (पसनी-कादार-कराची) उद्ध्वस्त करणे ही उद्दिष्ट होतेच. पश्चिमी नौदल कमांडचे मुख्य उद्दिष्ट होते अधिकाधिक पाकिस्तानी नौका उद्ध्वस्त करणे किंवा त्यांना आहेत तिथेच जखडून ठेवणे. त्यांना उद्ध्वस्त करण्यामुळे आपल्या व्यापारी जहाजांचे जाणे-येणे सुरळीत राहिले असते आणि आपल्या भूभागांवर बॉम्बहल्ले करण्यापासून त्यांना परावृत्त करणे शक्य होणार होते, असे करताना त्यांच्या शोधार्थ कराची बंदराकडे आगेकूच करणे भाग होते. ही आगेकूच होताना आम्ही शत्रूच्या टेहळणी फैरींच्या पट्टय़ात घेणार होतो. त्याचा एक अर्थ असाही होतो की, जोखीम अटळ होती. नौदलाची खरी कसोटी होती. तरुण धाडसी अधिकारी ही जोखीम घ्यायला उत्सुक आणि तत्पर होते.
या रणनीतीची दुसरीही बाजू होती. कराचीवर हल्ला करणे आणि तसे करताना ग्वादार व पासनीवर बॉम्बहल्ले चढवून समुद्रकिनार्यावर दहशत पसरविणे हाही उद्देश होताच. पाकिस्तानी नागरिक, सरकार आणि संरक्षणदल यांचा आत्मविश्वास खतम करणे हेही ठरविण्यात आले होते. कराची बंदराच्या नाकेबंदीतून आम्ही त्या राष्ट्राची रसद थांबविणार होतो. पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा तोडला की नाकेबंदी सफल होणार होती.
कराची बंदरापासून जवळ खोलवर पाणबुड्या तैनात करण्याच्या हालचाली होत्या. कराचीकडे दौडत असलेली व्यापारी जहाजे बुडवायची निश्चित होते.
दरम्यान, एप्रिल १९७१ मध्ये एक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय झालेला होता. पाकिस्तानी सैन्य विरोधी कारवायात गुंतलेल्या मुक्ती वाहिनीच्या गटांना सीमेलगत पुरेसे पाठबळ द्यायचे निश्चित होते. मुक्ती वाहिनीच्या कार्यकर्त्यांना लष्करी प्रशिक्षण देणे आणि त्यांच्याकडून चितगाव बंदराजवळची ऊर्जानिर्मिती केंद्र दळणवळण यंत्रणांना नेस्तनाबूत करण्यासाठी पाऊल निश्चितपणे उचलली जात होती.
युद्धज्वर स्पष्ट
भारतीय नौदलाची भक्कम भिंत तोडून पूर्व पाकिस्तानात रसद पुरविणे यावरच फक्त आता पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून होते. युद्धज्वर स्पष्ट दिसत होता.
२९ जुलै १९७१. परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली. ‘‘बांग्लादेशच्या हंगामी सरकारच्या विनंतीवरून भारतीय नौदलाच्या तुकडीने तिथल्या ४00 कमांडोजना प्रशिक्षित केले आहे.’ नाविक अधिकारी कमांडर एम. एन. सामंत या योजनेचे नेतृत्व करीत होते.
२१ नोव्हेंबर रोजी भारत आणि पाक सैन्यात पूर्वपाकिस्तानात बोयटा इथे चकमक उडाली. २२ नोव्हेंबरच्या रात्री पाक अध्यक्ष याह्याखान यांनी जाहीर केले की, येत्या दहा दिवसांत केव्हाही युद्धास तोंड फुटेल. दुसर्याच दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरला पाकिस्तानने आणीबाणी घोषित केली. ३ डिसेंबरला पाकने युद्ध घोषणाही करून टाकली.
अपेक्षा होती तेच घडू लागले. विक्रांत या विमानवाहू भारतीय बोटीकडे पाकिस्तानी पाणबुड्या झेपावल्या. भारतीय नौदलाने अफलातून शक्कल लढविली. विक्रांत ही विशाखापट्टणम बंदरात आहे असे ‘संदेश’ पाक नौदलापर्यंत पोहोचविले गेले. परिणामी, पाकिस्तानने ‘गाझी’ विशाखापट्टणम बंदराबाहेर तैनात करण्यात पाक चुकले नाही. वाटच पाहात बसलेली ही शिकार भारताच्या पट्टय़ात आली. शस्त्र डागले गेले. ३ आणि ४ डिसेंबर १९७१ च्या काळोखात ‘गाझीला’ जलसमाधी देण्यात आली. या दरम्यान विक्रांत प्रत्यक्षात अंदमान निकोबारच्या बंदरात डौलाने पहुडलेली शेती या अजस्त्र जहाजाने मग डोळे उघडले. सर्वदूर हल्ल्याचे आदेश पाळत पाळत विक्रांतने बॉक्सबाजार, चितगाव, मोंगला, घलन, खुलना, चितगाव विमानतळाच्या धावपट्टय़ांचा परिसर यावर जोरदार हवाई हल्ले केले. हे हल्ले साधेसुधे नव्हते जवळपास ३६ तासांच्या आत विक्रांतने भारतीय सैन्याचे हवाई सार्वभौमत्व प्रस्थापित केले होते. हे सार्वभौमत्व अख्ख्या बंगालच्या उपसागरात होते. आता कोणतीही परकी बोट किंवा विमान बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या परवानगीवाचून प्रवेश करूच शकणार नव्हते. विक्रांतवरील विमानांनी आणि विक्रांतसोबतच्या संरक्षक बोटींनी १८00 चौरस मैलाचा परिसर आपल्या नियंत्रणात घेतला होता. विक्रांतावरून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांनी एकूण सुमारे ५७ हजार टनाच्या १२ बोटी बुडवून टाकल्या होत्या. जेसोर, कोमिला आणि सिल्हेर या पाकिस्तानी युद्धनौकांना जायबंदी करून टाकले होते.
ट्राइडेन्ट फोर्स
भारतीय नौदलाने ३/४ डिसेंबरला रात्री पहिला क्षेपणास्त्र हल्ला चढविला. ट्राईडेन्ट असे त्याचे सांकेतिक नाव होते. सुयोग्य पूर्व तयारी आणि अनुक सलिम त्यामागे होती. चकमक घडेल तेव्हा पाकिस्तानी बोटी कराची जवळ गस्तीवर असतील, असा कयास होता. हे पूर्वानुमानाला खरे ठरले. या क्षेपणास्त्र हल्ल्यात बर्याच घटकांचा सहभाग आणि समन्वयक होता. दोन पेट्या क्रिगेटस्, १ तीर आणि किलतान या दोन युद्धनौका, ओसा जातीच्या तीन क्षेपणास्त्र सज्ज नौका, ‘निपट’, निरघट वीर या टीममध्ये समाविष्ट होत्या. पाकिस्तानने किंवा जगामध्ये कोणीही भारतीय नौदल कराचीवर क्षेत्रणास्त्राने हल्ला करू शकेल, असा विचार केला नव्हता. कारण भारताजवळ ज्या क्षेत्रणास्त्र सज्ज ‘ओसा’ जातीच्या छोट्या बोटी होत्या, त्याची क्षमता फारच कमी होती. त्या छोट्या बोटी मुंबई बंदराच्या सुरक्षतेसाठीच योग्य होत्या.
या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे तो नौदलप्रमुख अँडमिल नंदा यांच्या कार्यपद्धतीचा. प्रसंगी प्रत्यक्ष बोटीवरच्या दुय्यम अधिकार्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचनांचाही विचार करायला ते पुढे असत. नौदलातील काही तरुण अधिकार्यांनी सुचविल्याप्रमाणे ओसा जातीच्या बोटी लहान असूनही त्यांना पाण्याखालून ओटून (टो करून) ओरवा बंदरापर्यंत न्यायचे आणि पुढे कराची वर हल्ला करण्याची योजना आखली गेली. आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. पाकिस्तानी नौदल हे अरबी समुद्रावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वस्वी त्याच्या हवाई दलावर अवलंबून होते. या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरले. पाकिस्तानी हवाईदलाला इतरत्र गुंतवून भारतीय नौदलाने ओसा क्षेत्रणास्त्र सज्ज लहान बोटी ओरवापर्यंत आणल्यासुद्धा.
दरम्यान, दीव बंदरावरून इंधनाची पुरेशी रसद घेऊन या टाईडेन्ट फोर्सची द्वारकेच्या दिशेने आगेकूच सुरू असताना पाकिस्तानी पाणबुड्यांची जोखीम टाळण्यासाठी समुद्रालगत उथळ पाण्यातून वाट काढायची होती. द्वारकेजवळ म्हणजे कराची बंदरापासून अवघ्या १५0 मैलावर आल्यानंतर क्षेपणास्त्रे सज्ज बोटीचा वेग वाढवून अधिकतम म्हणजे ३२ नॉट वेगाने कराचीकडे आगेकूच सुरू झाली. हल्ला चढवून परतणार्या बोटींना कव्हर देण्यासाठी चौथी बोट द्वारकेजवळ नांगरण्यात आली. बंगालच्या उपसागरांना आता अरबी समुद्र खवळण्याची सुरुवात झाली हेाती.
३ आणि ४ डिसेंबर रात्री २ क्रिगेट्सच तसेच चार क्षेपणास्त्र सज्ज बोटींनी कराचीला घेरले. हल्ला चढविला. त्या रात्री पाकिस्तानी क्रुझर बाबर आणि सुरंगभेदी मुहाफिज या नांगरलेल्या होत्या. शक्का नावाची टँकरबोट मनोराजवळ होती. शहजहान ही युद्धबोट पूर्वेकडे कूच करण्याच्या तयारी होती. बद्र अलमगीर आणि तुघरील काही क्षणात कराची सोडणार हे स्पष्ट होते. खैबर आणि टिपू सुलतान या कराचीपासून ८0 मैल दूर दक्षिण व पश्चिमेस होत्या. जहांगिरला ६0 मैलावर तर झुल्फिकार या फ्रिगेटला ३0 मैलवर सज्ज उभे ठेवण्यात पाकिस्तानने बरीच हुशारी दाखवली होती. या सगळ्या विनाशिका होत्या.
पाकिस्तानने डाका हे आपले तेलाचे टँकरसुद्धा मुद्दामच वेगवेगळ्या व्यापारी जहाजांच्यामध्ये उभे करून चकविण्याचा प्रश्न चालविला होता. तो हाणून पाडण्यात आला. अवघ्या काही तासातच भारतीय नौदलाने आणखी चुणूक दाखवत खैबर, मुहाफिज या जहाजांना बुडविले. जुल्फिकार जवळपास नष्ट होत आली होती. केमारीचे तेलसाठे धडधडू लागले होते. हीनस आणि चॅलेंजर या व्यापारी नौकांना अक्षरश: ठोकून भाजून निष्क्रिय केले गेले.
क्षणोक्षणी स्थिती आता स्फोटक बनत चालली होती. भारतीय नौदलाने कठोर पावले उचलली होतीच. त्रिशूल तलवार आणि विनाश या युद्धनौकांनी विलक्षण गतीने कराची धावा बोलला होता. डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे पाकचे केमारी इंधनासाठी आगडोंब बनले हेाते. या युद्धकुंडात दुर्दैवाने हार्माटन ही ब्रिटिश बोट आणि गल्फस्टार ही पनामी बोट हल्ल्यात सापडली. पुढे गल्फस्टार बुडालीसुद्धा.
समुद्रस्त्र प्रस्थापित
डिसेंबरला अरेबियन समुद्रावरची आपली सत्ता सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट झाली होती. दरम्यान, १ डिसेंबरच्या रात्री आणखी एक प्रमुख धक्कादायक युद्धघटना घडली शेती. कमांडकर यांनी अहवाल दिला होता की, अन्वर बक्ष आणि बाखीर या व्यापारी बोटींवर पाकिस्तानी सैनिकच सामान्य प्रवाशांच्या वेशात आहेत व पळून जाण्याच्या बेतात आहेत.
या दरम्यान काही चिंताजनक घडामोडी सुरू झाल्या होत्या. अमेरिकन नौदलाचे सात क्रमांकाचे फ्लीट बंगालच्या उपसागराकडे वेगाने निघाले होते. या वेढय़ामध्ये पाच विनाशिका विमानवाहू नौका होती. ‘यू. एस. एंटरप्राईस’ पंचाहर हजार टनी युद्धनौका होती. विक्रांत त्या मानाने लहान म्हणजे १६00 टनी होती. एंटरप्राईझवर अणुभट्टय़ा होत्या. ३५ नॉट वेगाने ती धावू शकत होती. तिच्यावर सुमारे तीन हजार कर्मचारी तैनात होते. विविध प्रकारची युद्धसज्ज शंभर विमानरी होती.
१ डिसेंबरला एक फटका भारतीय नौदलला सहन करावा लागला. भारतीय पाणबुडी रोधक युद्धनौका आयएसएझ खुकरी अरबी समुद्रात गस्तीवर असताना कामी आली होती. पाकिस्तानी पाणबुडीने तिला पाणी पाजले होते. भारतीय नौदलास संपूर्ण युद्धात एवढेच एक मोठे नुकसान सोसावे लागले होते.
१४ डिसेंबर १९७१ भारतीय सैन्यासमोर ९४ हजार पाकिस्तानी सैनिकांनी शरणीगती पत्करली होती. भारताने एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली.
अमेरिकेचे सातवे आरमार, बंगालच्या उपसागरात पोचण्यापूर्वी पाकिस्तानी सैन्याची शरणागती आवश्यक होती. एकदा का अमेरिकन आरमार या युद्धात पडले की, हे युद्ध अनिर्णित राहणार होते. पाक सरसेनानी जनरल नियाझी हे युद्ध आठ, दहा दिवस लांबवू शकले असते. कसेही करून पाक सैन्याची शरणागती लवकरात लवकर आवश्यक होती. त्यासाठी भारतीय सेना, नौदल आणि वायुदलाने शिकस्त केली. सर्व ताकदीने सर्व बाजूंनी मारा सुरू केला. १४ डिसेंबर १९७१ रोजी जन नियाझी यांनी ९४ हजार सैनिकांसह बिनशर्त शरणागती स्वीकारली. भारताने लगोलग केलेल्या एकतर्फी युद्धविराम घोषणेमुळे अमेरिकन सातव्या आरमाराला काही उद्दिष्टच राहिले नाही. त्यांनी आपले आरमार परत बोलावले.
पाकिस्ताननेदेखील युद्धविरामाच्या भारतीय घोषणेस आपली सहमती जाहीर केली होती. बांग्लादेश जन्मास आला होता आणि शेख मुजीब उररहेमान या स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान बनले होते.
१९७१ ची युद्धोत्तर उपकथानकेही महत्त्वाची आहेत. भारताचा युद्धातील विजय त्यातील नौदलाची भूमिका अभिनंदयीन ठरली. सामुद्रिक सत्तेचे महत्त्व सरकारने ओळखले. भारत एक शांतताप्रिय देश असला तरी शांततेचे रक्षण करण्यासाठी सर्मथ नौदलाची आवश्यकता वादातीत ठरली. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात भारतीय आरमाराची सत्ता ‘नौ’ जगताने स्वीकारली. एक हजार वर्षांच्या इतिहासातील भारताच्या लष्करी सार्मथ्याचा हा तशा अर्थाने पहिला विजय होता. इतिहासात अनेक युद्धे लढली गेली. पण अवघ्या दोन आठवड्यांतच निर्णायकी विजय मिळवून देणारे एका स्वतंत्र देशाची निर्मिती करणारे हे युद्ध भारताला आंतरराष्ट्रीय क्षितिजावर संरक्षण झळाळी देऊन गेले.
मात्र विजय आणि पराक्रमाच्या आनंदात एक सल मनात कायम राहते. या विजयाचे शिल्पकार होते. फिल्डमार्शल नजरल माणेकशा या पराक्रमी योद्धय़ाच्या खणखणीत नेतृत्वाने जगाच्या नकाशावर सोनार बांगला अवतरला होता.