Tuesday, February 5, 2013

नौदलाची विजयी शर्थ- Indo Pak War

१९७१ च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताच्या नौदलाचा पराक्रम अतुलनीय असा होता. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांची जबरदस्त नाकेबंदी करून कराची बंदराला अक्षरश: भाजून काढले. चितगाव व ढाका पाडले.
त्यानंतरच बांग्लादेशाची निर्मिती झाली. या दिवसातील नौदलाच्या लढाईमध्ये अतुलनीय धाडस, कार्यक्षम कर्तृत्व गाजवून विशिष्ट सेवा मेडल मिळवून सन्मानित केलेले कमांडर विनायक आगाशे यांनी सांगितलेल्या थरारक आठवणी.

३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर लादलेले युद्ध १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने जिंकले. हे पंधरा दिवस निर्णायक विजयाची आठवण करून देतात. भारतीय लष्कराच्या विलक्षण समन्वयातून युद्ध निर्णायक ठरले. या पराक्रमातील भारतीय नौदलाचा सिंहाचा वाटा नजरेआड करता येणार नाही. अत्यंत वेगाने आणि फार कमी वेळेत प्रथम बंगालच्या उपसागरात आणि नंतर अरबी समुद्रात आपल्या आरमारी सज्जतेची चुणूक दाखविली गेली. चितगाव पाडण्यात आणि कराचीला घेरण्यात तसेच कित्येक पाक युद्धनौकांना पाणबुड्यांना जलसमाधी देण्यात नौदलाने अतुलनीय साहस दाखविले. या युद्धात सहभागी झालेले कमांडर विनायक आगाशे त्या वेळी आयएनएस विक्रांत, आयएनएस म्हैसूर तसेच पाणबुडीविरोधी विनाशिका कुठारवर विविध जबाबदार्‍यांवर तैनात होते. पुढील वर्षात त्यांनी ‘वाघली’ आणि ‘वेला’ या पाणबुड्यांचे नेतृत्वही केले.
३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१. अवघे चौदा दिवस. वेगवान घडामोडींनी भारताची तिन्ही सैन्यदले ढवळून निघालेली. युद्धइतिहासात १९७१ चे भारत-पाक युद्ध हे घडामोडींचा विलक्षण वेग, धोरणात्मक व्यूहरचना आणि अतिउत्तम समन्वय या तिन्ही दृष्टींनी अविस्मरण ठरले. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमधल्या श्रेष्ठ दर्जाच्या समन्वयाने आपल्याला विजय मिळवून दिला. हिंदुस्थानी सैन्यानं लष्करी लढाई जिंकण्याचा हा क्षण शेकडो वर्षांनी अवतरला हेाता. जगातील एका महत्त्वपूर्ण खंडाचा राजकीय-भौगोलिक नकाशा बदलून टाकणारे हे निर्णायक युद्ध होते. बांग्लादेशाच्या निर्मितीत हे सारे घडले होते. हा विजय केवळ युद्धातला नव्हता. राजकीय इच्छाशक्तीतून कसे राष्ट्रीय उद्दिष्ट साधले जाऊ शकते आणि संघभावनेतून एखादे युद्ध कसे ‘लाईटनिंग’ ठरू शकते याचा प्रत्यय देणारे हे युद्ध होते.
अशा या युद्धाशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे त्या अभिमानास्पद क्षणांची वारंवार आठवण होते आहे. नौदल अधिकारी म्हणून आयुष्य सार्थकी लागले अशा गौरवाच्या भावना या निमित्ताने दाटून येतात.
१९४७ च्या फाळणीनंतर पूर्व बंगाल हे पूर्व पाकिस्तान बनले. तिथे बंगाली बोलणारी मुस्लीम मंडळी बहुसंख्याक होती. भूभाग ही कसा अगदी छोटा. राजकीय-आर्थिक किंवा अगदी लष्करीदृष्ट्यादेखील विशेष प्रभाव नसलेला. किंबहुना शेकडो किलोमीटर अंतरावरून राज्य करणार्‍या उर्दू भाषिक पाक राज्यकर्त्यांनी आपल्याकडे सतत दुर्लक्षच केले, या भावनेतून पूर्व आणि पश्‍चिम पाकिस्तानात एक अदृश्य तणाव सतत होताच. १९७0 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पूर्व पाकिस्तानात प्राबल्य असलेल्या अवामी लीगला स्पष्ट बहुमत मिळालेले आणि पूर्व पाकचे सार्वभौमत्व ही तर अवामी लीगने निवडणुकांमध्ये व्यक्त केलेली बांधिलकी होती. पश्‍चिम पाकिस्तानातल्या लष्करी सत्तेला आणि राजकीय पुढार्‍यांना हे सारे सहन होणारे नव्हते. या संदर्भातल्या वाटाघाटी अपयशी ठरल्यावर अवामी लीगचे नेते मुजीबूर रहमान यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. २५ मार्च १९७१ पश्‍चिम पाकद्वारे एक क्रूर लष्करी वरवंटा फिरविण्यास सुरुवात झाली. मार्शल लॉ जाहीर करण्यात आला आणि सार्वभौमपणासाठी उभे राहणारे प्रत्येक आंदोलन हरप्रकारे दडपण्याची सुरुवात झाली. परिणाम इतके भीषण होते की, पूर्व पाकिस्तानातून निर्वासित होऊ लागलेले हे असंख्य लोक भारतीय हद्दीत आसरा शोधू लागले. विशेषत: सीमेला लागून असणारे भारतीय जिल्हे या लोंढय़ातून निर्माण होणार्‍या नव्या ताणतणावांना सामोरे जात होते. हा ताण सर्वव्यापी होता. त्याला सांप्रदायिक, भौगोलिक तणावाची सूज वाढत चालली होती. काही गट बदल्याच्या भावनेनेही पेटले होते. निर्वासितांचा हा आगडोंब भारत सरकारला केवळ डोकेदुखीच ठरला असे नव्हे, तर वेगाने परिस्थिती हाताबाहेर जाते आहे याचे निदर्शक होते.
पूर्व पाकिस्तानातील लष्करी क्रौर्य क्षणोक्षणी वाढत होते. भारताने याबाबत जागतिक मत बनावे या दृष्टीने विविधस्तरांवर हालचाली सुरू केल्या. प. पाकिस्तानच्या धुरंधरांनी ही सर्व अस्वस्थता थांबवून निर्वासितांचे लोंढे आपापल्या जागी परततील, असे वातावरण तयार करावे, प्रभावी पावले उचलावीत यासाठी भारतीय आवाहनाला फारच तोकडा प्रतिसाद मिळाला. पुरेसा जागतिक दबावदेखील वेगाने दिसून येत नव्हता. मात्र, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी जेव्हा ‘पाक’क्रौर्य जगापुढे मांडायला सुरुवात केली तेव्हा कुठे बाह्यजगाला थोडी-थोडी जाग आली. पण निर्वासित परतताहेत असे राजकीय वातावरण तयार करण्यापेक्षा प्रयत्नांनी बरीच दिशा जखमींना मदत, निर्वासितांना काही वस्तू पुरवणे एवढीच जाणवत होती. हळूहळू आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीच्या काही हालचाली घडू लागल्या तरी निर्वासितांचा मूळ प्रश्न अद्याप धगधगतच होता. या दरम्यान काही महत्त्वाच्या तीन घटना घडल्या, ते सांगितले पाहिजे.
महत्त्वाच्या तीन घटना
पहिली घटना म्हणजे, निर्वासितांचे जे गट छावण्यांमध्ये राहत होते त्यांच्या मनात बदल्याची आग धुमसत होती. निर्वासितांच्या बायकांची अब्रू लुटण्याच्या, त्यांची घरे उद्ध्वस्त करण्याच्या घटना पाकिस्तानी सैनिकांकडून सर्रास घडल्या होत्या. निर्वासितांचे हेच गट पुढे मुक्ती वाहिनीचे सैनिक-स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जाऊ लागले. पाकिस्तानी छळवादातून पूर्व बंगालची मुक्तता करणे आणि आपली मायभूमी बांग्लादेश स्वतंत्र म्हणून घोषित करणे, हा त्यांचा उद्देश होता. पूर्व पाकिस्तानात कार्यरत सैनिक आणि लष्करी अधिकारी मूळ पूर्व बंगालचे होते. यातले बरेच जण पाकिस्तानी लष्कराचा पूर्वानुभव घेऊन बाहेर पडलेले किंवा संशयास्पद निष्ठेचे आरोप ठेवून पाकिस्तानी लष्कराने काढून टाकलेलेही होते. तिथल्या नौदलातील अधिकार्‍यांशी पूर्वपीठिका अशीच काही होती. दोन्ही गट भारताच्या भूभागातून सक्रिय होते. डिसेंबर ७१ पूर्वी काहीकाळ त्यांच्या गनिमी कारवायांमुळे त्या भागातल्या वीजनिर्मिती केंद्राची बर्‍यापैकी पडझड झाली होती. दूरसंचार यंत्रणा, पूल, बंदरे, जहाज यांचेही नुकसान झाले होते.
दुसरी घटना म्हणजे, पाकिस्तानने हल्ला केलाच तर संभाव्य धोका ओळखून भारताने आपल्या संरक्षणार्थ करावयाच्या कारवाईचेही नियोजन तयार करण्यात आले होते. निर्वासितांनी परतावे म्हणून पूर्व बंगालात काही धडक सशस्त्र कारवाई सुरू करावी काय, याचीही गंभीर चाचपणी चालू होती. पाकिस्तानच्या संरक्षण व्यूहरचनेत पूर्वसीमेपेक्षा पश्‍चिमेवर आपले खतरनाक अस्तित्व दाखवण्यावर भर होता.
तिसरी घटना ही जास्त लक्षणीय म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरची भौगोलिक-राजकीय समीकरणे किंवा परस्पर संबंधांमधल्या बदलत्या छटा स्पष्ट होत्या. व्हिएतनाममधील गुंता सुटावा म्हणून १९७१ मध्ये चीनशी जवळीक करण्यासाठी अमेरिका पावले उचलीत होता. उएठळड आणि रएअळड मधला एक सदस्य म्हणून पाकिस्तान चीनशी जवळीक साधून होता. आपल्या या जवळकीचा फायदा अमेरिकेने चीनशी जवळीक करण्यासाठी घ्यावा, अशी पाकिस्तानची क्लृप्ती होती. या सक्रियतेचा परिणाम लवकरच दिसून आला. १९७१च्या उत्तरार्धात अमेरिकेने पाकिस्तान धाजिर्णे धोरण स्पष्ट केले. याला प्रतिशह म्हणून ऑगस्ट १९७१ मध्ये भारताने रशियाशी मैत्रीकरार केला. खरेतर १९६९ पासूनच याबाबत चर्चा चालू होती.
या दरम्यान भारतीय संरक्षण क्षितिजावर कोण कोण धुरंधर होते हेही एकदा पाहिले पाहिजे. भारतीय लष्कराची सूत्रे जनरल एसएफजेएफ माणेकशा यांच्याकडे तर नौदलप्रमुख अँडमिरल एस. एम. नंदा आणि हवाईदल प्रमुख होते एअरचीफ मार्शल पी. सी. लाल. तिन्ही दलाच्या समन्वयाची मुख्य जबाबदारी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख म्हणून जनरल माणेकशा यांची होती. नौदलाच्या पश्‍चिम विभागाचे मुख्य ‘फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ हेाते अँडमिरल एस. एन. कोल्ही. पूर्व नेव्हल कमांडची जबाबदारी व्हाईस अँडमिरल एन. कृष्णन यांची होती. पूर्वेची व्हाईस अँडमिरल व्ही. ए. कामत यांची प्रत्यक्ष समुद्रातील पश्‍चिमी नौदल तुकडीचे (फ्लींट) नेतृत्व व्हा. अँडमिरल ई. सी. कुरुविला तर पूर्व तुकडीचे नेतृत्व व्हा. अँडमिरल एस. एच. शर्मा करीत होते.
एप्रिल १९७१. महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठक भरलेली. जनरल माणेकशा यांची विशेष उपस्थिती होती. पूर्वेकडचा बिकट प्रश्न सोडविण्यासाठी युद्धाची गरज पडली तर काय खात्री देऊ शकता? असा सरळ प्रश्न इंदिराजींनी विचारला. माणेकशा यांनी युद्धासाठी स्थिती प्रतिकूल असल्याचे रोखठोक प्रतिपादन केले. ‘एप्रिल जवळपास संपला आहे. मान्सून नजीक येऊन ठेपला आहे. पूर्व पाकिस्तानातल्या नद्या पावसाळ्य़ात महासागराचे उग्र रूप धारण करतात. अशा परिस्थितीत लष्कराची ने-आण आणि युद्धसामग्रीचे दळणवळण अवघड होईल. त्यात महत्त्वाचा वेळदेखील जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आमचे रणगाडे बबिना आणि सिकंदराबाद परिसरात आहेत. बाकीचे सैन्य देशभर पसरलेले आहे. हे सैन्य उत्तरेकडे आणि पूर्व पाकच्या सरहद्दीवर त्वरित हलवावे लागेल. त्यासाठी संपूर्ण रेल्वेमार्ग वापरावे लागतील.’ कॅबिनेटमध्ये उपस्थित कृषिमंत्री फक्रुद्दीन अली अहमद यांच्याकडे वळून माणेकशा म्हणाले, ‘‘सध्या शेतांमध्ये धान्य तयार आहेत. खळ्य़ातले सर्व धान्य बाजारपेठेत पोहोचले नाही तर ते शेतातच खराब होऊन जाईल आणि दुष्काळ पडण्याचे खापर तुम्ही सैन्यावर टाकाल.’’ माणेकशांच्या प्रतिपादनात जरब होती. त्यांनी तिसरी व्यूहात्मक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. ‘आता जर आपण लगेच युद्धाचा निर्णय घेतला तर चारही सरहद्दींवर आपल्याला तैनातीची गरज भासेल. पण आपण नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत थांबलो तर उत्तरसीमेची काळजी कडाक्याची थंडी व गोठलेला हिमालयच घेतील.’ पंतप्रधानांना हे तर्कशुद्ध विवेचन पटले असावे. नोव्हेबर अखेरपर्यंत थांबण्याचा निर्णय झाला. खंबीर आणि निर्णायक शस्त्रक्षेपाच्या तयारीला वेग आला.
इकडे पाकिस्तानची तयारीही अगदीच दुबळी नव्हती. समुद्रपृष्ठावर राहून काम करणार्‍या जहाजांच्या बाबतीत ते तूल्यबळ तर होतेच, पण ‘पाण्याखालून’ मारा करावयाच्या शस्त्रसज्जतेबाबत ते काकणभर सरसच होते. याचे एक कारण लक्षात घेण्यासारखे आहे. १९६३ मध्ये अमेरिकेने एक पाणबुडी लीजवर पाकिस्तानी नौदलास हस्तांतरित करण्यास मान्यता दिली होती. या मान्यतेनुसार डायाब्लो ही अडीच हजार टनी पाणबुडी अमेरिकन नौदलाने १ जून १९६४ मध्ये पाकिस्तानला दिली. नुसती दिलीच नाही तर देण्यापूर्वी तिला अद्ययावत करून ‘फ्लिट स्नॉरकेल’चा संरचनात्मक दर्जा देण्यात आला. सप्टेंबर १९६४ मध्ये कराचीत तिचे पीएनस गाझी (एसएस ४७९) असे नामकरणही झाले. याचदरम्यान फ्रेंच सरकारने तीन ‘डॅफने’ दर्जाच्या पाणबुड्या पाकिस्तानला देण्यास तत्त्वत: मान्यता जाहीर केली होती. त्यानुसार १ डिसेंबर १९६९ मध्ये पहिली ‘हॅँगर’, दुसरी १२ जानेवारी १९७0 मध्ये ‘शुशुक’ आणि तिसरी ५ ऑगस्ट १९७0 मध्ये ‘मँगरो’ या पाणबुड्या कराचीत दाखल झाल्या. भरीस भर म्हणून पाकिस्तानने आणखी सहा ‘एक्स’क्राफ्ट (मिडगेट पाणबुड्या) आणि सहा चॅरियट्सदेखील घेतल्या. चॅरियट्स लिम्पेट माईन्सनी शस्त्रसज्ज होत्या हे सांगितले पाहिजे. थोडक्यात खुमखुमी स्पष्ट होती.
भारतानेही १९६९-७0 मध्ये प्रशिक्षणासाठी
यू-१२८ या र्जमन बनावटीच्या ‘पाणबुड्या रशियाकडून घेतल्या. कालवेरी, खंदेरी, करंज आणि कुरसुरा अशी नावे त्यांना देण्यात आली. महत्त्वपूर्ण मुंबई बंदराच्या संरक्षणासाठी ८ क्षेपणास्त्र (ट्र२२्र’ी ु३२) सज्ज बोटीही नौदलाने घेतल्या. त्यांचा पल्ला (ील्ल४ि१ल्लूी) खूप कमी होते.
विक्रांतची काळजी
या दरम्यान आपले सर्वात मोठे लढव्वये जहाज आयएमएस विक्रांत हे त्याच्या स्वत:च्या सुरक्षेबाबत संवेदनशील विषय होऊन बसले होते. खरं तर ती एकतीस वर्षे जुनी असल्यामुळे अनेक प्रकारच्या चिंता ‘विक्रांत’ संदर्भात निर्माण झाल्या होत्या. वेगवेगळ्य़ा विश्लेषणातून नौदलाने असा निष्कर्ष काढला होता की, विक्रांतला शत्रूच्या शस्त्रसज्ज पाणबुड्यांचे धोके होते. ‘गाझी’ला बंगालच्या उपसागरात पेरायचे आणि विमानवाहू विक्रांतला जायबंदी करायचे ‘पाक’चा इरादा स्पष्ट होता. ही जोखीम भयंकर होती. या मानबिंदूवर हल्ला किंवा तिला जलसमाधीने भारतीयांचे नीतिधैर्य खचले असते.
अशा वेळी भारतीय नौदलाची रणनिती टोकदार असणे गरजेचे होते. तशी ती आखलीही गेली. दोन्ही पाकिस्तानची संपूर्ण समुद्री नाकेबंदी हे मुख्य ध्येय होते. चितगाव बंदरावर समुद्रातून हल्ला करणे, रॉकबझार, छल्लना, खुलना आणि मोंगला या बंदरांवर हल्ले करणे, बंदरावरील तसेच खोल समुद्रातील पाक नौकांना उद्ध्वस्त करणे, महत्त्वाच्या लक्ष्यांवर एकाचवेळी हल्ले करणे, अशी ही रणनीती होती. रियल अँम्पी वियस लँडिंग हेदेखील एक विशेष उद्दिष्ट होतेच. सिलोनच्या (आता श्रीलंका) दक्षिणेकडून प. पाकिस्तानच्या व्यापारी तसेच संरक्षण जहाजांवर हल्ले करतानाच त्या देशाच्या सामुद्रिक सज्जतेविषयी महत्त्वाची माहिती भारतीय नौदलास पुरविणे हीदेखील नौदलाची जबाबदारी होती. जुनी ‘मगर’ आणि तिच्या जोडीला नव्या ‘गुलदार’ आणि ‘घडीयाल’ या तीन युद्धबोटीही सज्ज करण्यात आल्या. सामुद्रिक हल्ल्याकरिता जनरल सपोर्ट ड्यूटी हे त्यांचे काम होते व पाकची बंदरे (पसनी-कादार-कराची) उद्ध्वस्त करणे ही उद्दिष्ट होतेच. पश्‍चिमी नौदल कमांडचे मुख्य उद्दिष्ट होते अधिकाधिक पाकिस्तानी नौका उद्ध्वस्त करणे किंवा त्यांना आहेत तिथेच जखडून ठेवणे. त्यांना उद्ध्वस्त करण्यामुळे आपल्या व्यापारी जहाजांचे जाणे-येणे सुरळीत राहिले असते आणि आपल्या भूभागांवर बॉम्बहल्ले करण्यापासून त्यांना परावृत्त करणे शक्य होणार होते, असे करताना त्यांच्या शोधार्थ कराची बंदराकडे आगेकूच करणे भाग होते. ही आगेकूच होताना आम्ही शत्रूच्या टेहळणी फैरींच्या पट्टय़ात घेणार होतो. त्याचा एक अर्थ असाही होतो की, जोखीम अटळ होती. नौदलाची खरी कसोटी होती. तरुण धाडसी अधिकारी ही जोखीम घ्यायला उत्सुक आणि तत्पर होते.
या रणनीतीची दुसरीही बाजू होती. कराचीवर हल्ला करणे आणि तसे करताना ग्वादार व पासनीवर बॉम्बहल्ले चढवून समुद्रकिनार्‍यावर दहशत पसरविणे हाही उद्देश होताच. पाकिस्तानी नागरिक, सरकार आणि संरक्षणदल यांचा आत्मविश्‍वास खतम करणे हेही ठरविण्यात आले होते. कराची बंदराच्या नाकेबंदीतून आम्ही त्या राष्ट्राची रसद थांबविणार होतो. पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा तोडला की नाकेबंदी सफल होणार होती.
कराची बंदरापासून जवळ खोलवर पाणबुड्या तैनात करण्याच्या हालचाली होत्या. कराचीकडे दौडत असलेली व्यापारी जहाजे बुडवायची निश्‍चित होते.
दरम्यान, एप्रिल १९७१ मध्ये एक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय झालेला होता. पाकिस्तानी सैन्य विरोधी कारवायात गुंतलेल्या मुक्ती वाहिनीच्या गटांना सीमेलगत पुरेसे पाठबळ द्यायचे निश्‍चित होते. मुक्ती वाहिनीच्या कार्यकर्त्यांना लष्करी प्रशिक्षण देणे आणि त्यांच्याकडून चितगाव बंदराजवळची ऊर्जानिर्मिती केंद्र दळणवळण यंत्रणांना नेस्तनाबूत करण्यासाठी पाऊल निश्‍चितपणे उचलली जात होती.
युद्धज्वर स्पष्ट
भारतीय नौदलाची भक्कम भिंत तोडून पूर्व पाकिस्तानात रसद पुरविणे यावरच फक्त आता पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून होते. युद्धज्वर स्पष्ट दिसत होता.
२९ जुलै १९७१. परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली. ‘‘बांग्लादेशच्या हंगामी सरकारच्या विनंतीवरून भारतीय नौदलाच्या तुकडीने तिथल्या ४00 कमांडोजना प्रशिक्षित केले आहे.’ नाविक अधिकारी कमांडर एम. एन. सामंत या योजनेचे नेतृत्व करीत होते.
२१ नोव्हेंबर रोजी भारत आणि पाक सैन्यात पूर्वपाकिस्तानात बोयटा इथे चकमक उडाली. २२ नोव्हेंबरच्या रात्री पाक अध्यक्ष याह्याखान यांनी जाहीर केले की, येत्या दहा दिवसांत केव्हाही युद्धास तोंड फुटेल. दुसर्‍याच दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरला पाकिस्तानने आणीबाणी घोषित केली. ३ डिसेंबरला पाकने युद्ध घोषणाही करून टाकली.
अपेक्षा होती तेच घडू लागले. विक्रांत या विमानवाहू भारतीय बोटीकडे पाकिस्तानी पाणबुड्या झेपावल्या. भारतीय नौदलाने अफलातून शक्कल लढविली. विक्रांत ही विशाखापट्टणम बंदरात आहे असे ‘संदेश’ पाक नौदलापर्यंत पोहोचविले गेले. परिणामी, पाकिस्तानने ‘गाझी’ विशाखापट्टणम बंदराबाहेर तैनात करण्यात पाक चुकले नाही. वाटच पाहात बसलेली ही शिकार भारताच्या पट्टय़ात आली. शस्त्र डागले गेले. ३ आणि ४ डिसेंबर १९७१ च्या काळोखात ‘गाझीला’ जलसमाधी देण्यात आली. या दरम्यान विक्रांत प्रत्यक्षात अंदमान निकोबारच्या बंदरात डौलाने पहुडलेली शेती या अजस्त्र जहाजाने मग डोळे उघडले. सर्वदूर हल्ल्याचे आदेश पाळत पाळत विक्रांतने बॉक्सबाजार, चितगाव, मोंगला, घलन, खुलना, चितगाव विमानतळाच्या धावपट्टय़ांचा परिसर यावर जोरदार हवाई हल्ले केले. हे हल्ले साधेसुधे नव्हते जवळपास ३६ तासांच्या आत विक्रांतने भारतीय सैन्याचे हवाई सार्वभौमत्व प्रस्थापित केले होते. हे सार्वभौमत्व अख्ख्या बंगालच्या उपसागरात होते. आता कोणतीही परकी बोट किंवा विमान बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाच्या परवानगीवाचून प्रवेश करूच शकणार नव्हते. विक्रांतवरील विमानांनी आणि विक्रांतसोबतच्या संरक्षक बोटींनी १८00 चौरस मैलाचा परिसर आपल्या नियंत्रणात घेतला होता. विक्रांतावरून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांनी एकूण सुमारे ५७ हजार टनाच्या १२ बोटी बुडवून टाकल्या होत्या. जेसोर, कोमिला आणि सिल्हेर या पाकिस्तानी युद्धनौकांना जायबंदी करून टाकले होते.
ट्राइडेन्ट फोर्स
भारतीय नौदलाने ३/४ डिसेंबरला रात्री पहिला क्षेपणास्त्र हल्ला चढविला. ट्राईडेन्ट असे त्याचे सांकेतिक नाव होते. सुयोग्य पूर्व तयारी आणि अनुक सलिम त्यामागे होती. चकमक घडेल तेव्हा पाकिस्तानी बोटी कराची जवळ गस्तीवर असतील, असा कयास होता. हे पूर्वानुमानाला खरे ठरले. या क्षेपणास्त्र हल्ल्यात बर्‍याच घटकांचा सहभाग आणि समन्वयक होता. दोन पेट्या क्रिगेटस्, १ तीर आणि किलतान या दोन युद्धनौका, ओसा जातीच्या तीन क्षेपणास्त्र सज्ज नौका, ‘निपट’, निरघट वीर या टीममध्ये समाविष्ट होत्या. पाकिस्तानने किंवा जगामध्ये कोणीही भारतीय नौदल कराचीवर क्षेत्रणास्त्राने हल्ला करू शकेल, असा विचार केला नव्हता. कारण भारताजवळ ज्या क्षेत्रणास्त्र सज्ज ‘ओसा’ जातीच्या छोट्या बोटी होत्या, त्याची क्षमता फारच कमी होती. त्या छोट्या बोटी मुंबई बंदराच्या सुरक्षतेसाठीच योग्य होत्या.
या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे तो नौदलप्रमुख अँडमिल नंदा यांच्या कार्यपद्धतीचा. प्रसंगी प्रत्यक्ष बोटीवरच्या दुय्यम अधिकार्‍यांशी संवाद साधून त्यांच्या सूचनांचाही विचार करायला ते पुढे असत. नौदलातील काही तरुण अधिकार्‍यांनी सुचविल्याप्रमाणे ओसा जातीच्या बोटी लहान असूनही त्यांना पाण्याखालून ओटून (टो करून) ओरवा बंदरापर्यंत न्यायचे आणि पुढे कराची वर हल्ला करण्याची योजना आखली गेली. आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. पाकिस्तानी नौदल हे अरबी समुद्रावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वस्वी त्याच्या हवाई दलावर अवलंबून होते. या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरले. पाकिस्तानी हवाईदलाला इतरत्र गुंतवून भारतीय नौदलाने ओसा क्षेत्रणास्त्र सज्ज लहान बोटी ओरवापर्यंत आणल्यासुद्धा.
दरम्यान, दीव बंदरावरून इंधनाची पुरेशी रसद घेऊन या टाईडेन्ट फोर्सची द्वारकेच्या दिशेने आगेकूच सुरू असताना पाकिस्तानी पाणबुड्यांची जोखीम टाळण्यासाठी समुद्रालगत उथळ पाण्यातून वाट काढायची होती. द्वारकेजवळ म्हणजे कराची बंदरापासून अवघ्या १५0 मैलावर आल्यानंतर क्षेपणास्त्रे सज्ज बोटीचा वेग वाढवून अधिकतम म्हणजे ३२ नॉट वेगाने कराचीकडे आगेकूच सुरू झाली. हल्ला चढवून परतणार्‍या बोटींना कव्हर देण्यासाठी चौथी बोट द्वारकेजवळ नांगरण्यात आली. बंगालच्या उपसागरांना आता अरबी समुद्र खवळण्याची सुरुवात झाली हेाती.
३ आणि ४ डिसेंबर रात्री २ क्रिगेट्सच तसेच चार क्षेपणास्त्र सज्ज बोटींनी कराचीला घेरले. हल्ला चढविला. त्या रात्री पाकिस्तानी क्रुझर बाबर आणि सुरंगभेदी मुहाफिज या नांगरलेल्या होत्या. शक्का नावाची टँकरबोट मनोराजवळ होती. शहजहान ही युद्धबोट पूर्वेकडे कूच करण्याच्या तयारी होती. बद्र अलमगीर आणि तुघरील काही क्षणात कराची सोडणार हे स्पष्ट होते. खैबर आणि टिपू सुलतान या कराचीपासून ८0 मैल दूर दक्षिण व पश्‍चिमेस होत्या. जहांगिरला ६0 मैलावर तर झुल्फिकार या फ्रिगेटला ३0 मैलवर सज्ज उभे ठेवण्यात पाकिस्तानने बरीच हुशारी दाखवली होती. या सगळ्या विनाशिका होत्या.
पाकिस्तानने डाका हे आपले तेलाचे टँकरसुद्धा मुद्दामच वेगवेगळ्या व्यापारी जहाजांच्यामध्ये उभे करून चकविण्याचा प्रश्न चालविला होता. तो हाणून पाडण्यात आला. अवघ्या काही तासातच भारतीय नौदलाने आणखी चुणूक दाखवत खैबर, मुहाफिज या जहाजांना बुडविले. जुल्फिकार जवळपास नष्ट होत आली होती. केमारीचे तेलसाठे धडधडू लागले होते. हीनस आणि चॅलेंजर या व्यापारी नौकांना अक्षरश: ठोकून भाजून निष्क्रिय केले गेले.
क्षणोक्षणी स्थिती आता स्फोटक बनत चालली होती. भारतीय नौदलाने कठोर पावले उचलली होतीच. त्रिशूल तलवार आणि विनाश या युद्धनौकांनी विलक्षण गतीने कराची धावा बोलला होता. डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे पाकचे केमारी इंधनासाठी आगडोंब बनले हेाते. या युद्धकुंडात दुर्दैवाने हार्माटन ही ब्रिटिश बोट आणि गल्फस्टार ही पनामी बोट हल्ल्यात सापडली. पुढे गल्फस्टार बुडालीसुद्धा.
समुद्रस्त्र प्रस्थापित
डिसेंबरला अरेबियन समुद्रावरची आपली सत्ता सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट झाली होती. दरम्यान, १ डिसेंबरच्या रात्री आणखी एक प्रमुख धक्कादायक युद्धघटना घडली शेती. कमांडकर यांनी अहवाल दिला होता की, अन्वर बक्ष आणि बाखीर या व्यापारी बोटींवर पाकिस्तानी सैनिकच सामान्य प्रवाशांच्या वेशात आहेत व पळून जाण्याच्या बेतात आहेत.
या दरम्यान काही चिंताजनक घडामोडी सुरू झाल्या होत्या. अमेरिकन नौदलाचे सात क्रमांकाचे फ्लीट बंगालच्या उपसागराकडे वेगाने निघाले होते. या वेढय़ामध्ये पाच विनाशिका विमानवाहू नौका होती. ‘यू. एस. एंटरप्राईस’ पंचाहर हजार टनी युद्धनौका होती. विक्रांत त्या मानाने लहान म्हणजे १६00 टनी होती. एंटरप्राईझवर अणुभट्टय़ा होत्या. ३५ नॉट वेगाने ती धावू शकत होती. तिच्यावर सुमारे तीन हजार कर्मचारी तैनात होते. विविध प्रकारची युद्धसज्ज शंभर विमानरी होती.
१ डिसेंबरला एक फटका भारतीय नौदलला सहन करावा लागला. भारतीय पाणबुडी रोधक युद्धनौका आयएसएझ खुकरी अरबी समुद्रात गस्तीवर असताना कामी आली होती. पाकिस्तानी पाणबुडीने तिला पाणी पाजले होते. भारतीय नौदलास संपूर्ण युद्धात एवढेच एक मोठे नुकसान सोसावे लागले होते.
१४ डिसेंबर १९७१ भारतीय सैन्यासमोर ९४ हजार पाकिस्तानी सैनिकांनी शरणीगती पत्करली होती. भारताने एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली.
अमेरिकेचे सातवे आरमार, बंगालच्या उपसागरात पोचण्यापूर्वी पाकिस्तानी सैन्याची शरणागती आवश्यक होती. एकदा का अमेरिकन आरमार या युद्धात पडले की, हे युद्ध अनिर्णित राहणार होते. पाक सरसेनानी जनरल नियाझी हे युद्ध आठ, दहा दिवस लांबवू शकले असते. कसेही करून पाक सैन्याची शरणागती लवकरात लवकर आवश्यक होती. त्यासाठी भारतीय सेना, नौदल आणि वायुदलाने शिकस्त केली. सर्व ताकदीने सर्व बाजूंनी मारा सुरू केला. १४ डिसेंबर १९७१ रोजी जन नियाझी यांनी ९४ हजार सैनिकांसह बिनशर्त शरणागती स्वीकारली. भारताने लगोलग केलेल्या एकतर्फी युद्धविराम घोषणेमुळे अमेरिकन सातव्या आरमाराला काही उद्दिष्टच राहिले नाही. त्यांनी आपले आरमार परत बोलावले.
पाकिस्ताननेदेखील युद्धविरामाच्या भारतीय घोषणेस आपली सहमती जाहीर केली होती. बांग्लादेश जन्मास आला होता आणि शेख मुजीब उररहेमान या स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान बनले होते.
१९७१ ची युद्धोत्तर उपकथानकेही महत्त्वाची आहेत. भारताचा युद्धातील विजय त्यातील नौदलाची भूमिका अभिनंदयीन ठरली. सामुद्रिक सत्तेचे महत्त्व सरकारने ओळखले. भारत एक शांतताप्रिय देश असला तरी शांततेचे रक्षण करण्यासाठी सर्मथ नौदलाची आवश्यकता वादातीत ठरली. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात भारतीय आरमाराची सत्ता ‘नौ’ जगताने स्वीकारली. एक हजार वर्षांच्या इतिहासातील भारताच्या लष्करी सार्मथ्याचा हा तशा अर्थाने पहिला विजय होता. इतिहासात अनेक युद्धे लढली गेली. पण अवघ्या दोन आठवड्यांतच निर्णायकी विजय मिळवून देणारे एका स्वतंत्र देशाची निर्मिती करणारे हे युद्ध भारताला आंतरराष्ट्रीय क्षितिजावर संरक्षण झळाळी देऊन गेले.
मात्र विजय आणि पराक्रमाच्या आनंदात एक सल मनात कायम राहते. या विजयाचे शिल्पकार होते. फिल्डमार्शल नजरल माणेकशा या पराक्रमी योद्धय़ाच्या खणखणीत नेतृत्वाने जगाच्या नकाशावर सोनार बांगला अवतरला होता.

Sunday, February 3, 2013

घुबडांची प्रजाती त्यांची मान रक्तप्रवाह खंडित न होता २७० अंशाच्या कोनात कशी वळवू शकते, याचे रहस्य अमेरिकेतील संशोधकांनी उलगडल्याचा दावा  नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनातून करण्यात आला आहे. अमेरिकेतील बाल्टिमोर येथील जोन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी बरीच वर्षे संशोधन करून हा निष्कर्ष नुकताच जाहीर केला. घुबड ही एकमेव पक्षाप्रजाती स्वत:ची मान कोणत्याही दिशेला २७० अंशाच्या कोनात वळवू शकते, याचे रहस्य उलगडण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनाला आता यश आल्याचे जगप्रसिद्ध न्युरोरेडिओलॉजिस्ट फिलिप गेलाऊड यांनी इंटरनेटवर प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. 
 घुबडाने २७० अंश कोनात मान वळविल्यानंतरही त्याच्या मानेतील आणि डोक्यातील रक्तवाहिन्यांना इजा पोहोचत नाही तसेच त्याच्या मेंदूला होणारा रक्तप्रवाहदेखील थांबत नाही, हॉपकिन्स विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी यावर कठोर संशोधन केले. जगभरात हजारोंच्या संख्येने अस्तित्वात असलेल्या घुबडांच्या प्रजातीला निसर्गाने दिलेली ही अत्यंत आश्चर्यकारक देणगी आहे. घुबडांचा अपवाद वगळता जगातील कोणताही मनुष्यप्राणी, पशु वा पक्षी २७० अंशाच्या कोनात मान वळवू शकत नाही. मेंदूशास्त्र संशोधकांनी हे रहस्य जाणून घेण्यासाठी विविध प्रजातीच्या घुबडांच्या मस्तकातील आणि मानेतील हाडे तसेच रक्तवाहिन्यांचे अत्यंत सूक्ष्म संशोधन केले. घुबडांच्या नैसर्गिक मृत्यूनंतर हे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला. त्याची क्ष किरण छायाचित्रे घेण्यात आली. घुबडांच्या रक्तवाहिन्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे 'डाय' सोडून रक्तप्रवाहावर होणार परिणाम तपासण्यात आला तसेच घुबडाची मान मानवी प्रयत्नाने वळविण्यात आली. 
घुबडाच्या मस्तकाखाली असलेल्या रक्तवाहिन्या, जबडय़ाखालील हाडे जास्तीत जास्त आकुंचन पावत असल्याचे या संशोधनात आढळून आले. या राखीव रक्तवाहिन्यांमधून घुबडांना मान कितीही अंशाच्या कोनात वळविल्यानंतरही मेंदू, मान आणि डोळ्यांना रक्तपुरवठा केला जात असल्याने त्यांची ऊर्जा कायम राहते, रक्तप्रवाह खंडित होत नाही आणि घुबड २७० अंश कोनापर्यंत मान वळवू शकते, असा निकष संशोधकांनी काढला आहे. गेल्या १ फेब्रुवारीच्या विज्ञान नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

Amazing facts of human body.


Our heart beats around 100,00 times every day.
Our blood is on a 60,000-mile journey.
Our eyes can distinguish up to one million colour surfaces and take in more information than the largest telescope known to man.
Our lungs inhale over two million litres of air every day, without even thinking. They are large enough to cover a tennis court.
Our hearing is so sensitive it can distinguish between hundreds of thousands of different sounds.
Our sense of touch is more refined than any device ever created.
Our brain is more complex than the most powerful computer and has over 100 billion nerve cells.
We give birth to 100 billion red cells every day.
When we touch something, we send a message to our brain at 124 mph ( 199.559 Kmph )
We have over 600 muscles.
We exercise at least 30 muscles when we smile.
We are about 70 percent water.
We make one litre of saliva a day.
Our nose is our personal air-conditioning system: it warms cold air, cools hot air and filters impurities.
In one square inch of our hand we have nine feet of blood vessels, 600 pain sensors, 9000 nerve endings, 36 heat sensors and 75 pressure sensors.
We have copper, zinc, cobalt, calcium, manganese, phosphates, nickel and silicon in our bodies.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी

न्यूयॉर्क सिटीच्या मोहनगरीचे आकर्षण सर्व जगाला अनेक वर्षांपासून आहे. अमेरिका जेव्हा वसायला सुरुवात झाली तेव्हा जगातल्या कानाकोपर्‍यातून हजारो लाखो लोक बोटीने या मायानगरीकडे यायचे व समुद्राच्या मध्यभागी एलिस बेटावर हातात मशाल व पुस्तक घेऊन उभा असलेला स्वातंत्र्यदेवतेचा शांत पुतळा पाहिला की, त्यांना सगळ्या श्रमांचे सार्थक झाले असे वाटायचे. आता अमेरिकत बोटीने येण्याऐवजी माणसे विमानाने येतात, पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिला की, त्यांच्या डोळ्यातून आजही पाणी ओघळायला लागते. पुतळ्याच्या आजूबाजूची दूर देशाहून येणार्‍या मोठ्या बोटीची आवजाव थांबली असेल, पण छोट्या छोट्या बोटीचा सुळसुळाट मात्र भलताच वाढला आहे. सध्या न्यूयॉर्क व न्यूजर्सीला विभागणार्‍या हडसन महानदीतून अनेक क्रुझेस चालतात. काही दुपारच्या तर काही रात्रीच्या. दोनतीन तास न्यूयॉर्क शहराच्या कडकडेने हडसन नदीतून प्रवाशांना फिरवत न्यूयॉर्क शहर,शहराच्या मॅनहॅटन , क्वीन्स, ब्रुकलिन, स्टॅटन आयलंड या बेटांना एकमेकांशी जोडणारे अनेक पूल दाखवतात व सरतेशेवटी पुतळ्याच्या खाली बोटी उभ्या राहतात, बोटीतले प्रवासी उत्सुकतेने डेकवर येत पुतळ्याचे, पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर आपले अनेक फोटो काढून घेतात. काही काळ तिथे थांबून बोटी मग पुतळ्याखालून वळतात व आलेल्या बंदरावर परत जातात. पुतळा दिसेनासा होईस्तोपर्यंत बोटीतले प्रवासी त्याचे सौंदर्य अनिमिष नेत्रांनी न्याहाळत असतात. १८८६ साली उभारलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आजही दिमाखात उभा आहे. ९-११ -११ साली अतिरेक्यांनी नामशेष केलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती समोर जळताना दिसत होत्या तेव्हाही तो तसाच उभा होता. फक्त खात्री आहे की, स्वातंत्र्यदेवतेच्या डोळ्यातून तेव्हा आसवे ढळली असतील.
इंग्रजांपासून अमेरिकेला १७७६ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजांचा कट्टर शत्रू असलेल्या फ्रान्स देशामधील काही राजकारणी माणसांनी अमेरिकेला स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा भेट द्यायचे ठरवले. अमेरिकेने पुतळ्याच्या खालचा चबुतरा बनवायचा व फ्रान्सने पुतळा बनवायचा असे ठरले. अंगात पायघोळ झगा , हातात ज्या िर्ंिदवशी स्वातंत्र्य मिळाले ती ४ जुलै १७७६ ही तारीख कोरलेले पुस्तक व स्वातंत्र्याची मशाल अणि पायाशी तुटलेली शृंखला असा रोमन लोकांची स्वातंत्र्यदेवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लिबर्टास देवीचा पुतळा फ्रेडरिक बार्थाल्डी नावाच्या फ्रेच माणसाने बनवायला घेतला. पुतळ्याचे डोके व मशाल घेतलेला हात बनवून झाला, पण तेवढ्यात फ्रान्समधे अत्यंत राजकीय आस्थरता निर्माण झाली. त्यामुळे सगळा पुतळा तिथेच पूर्ण करण्याऐवजी झालेले काम घेऊन बार्थेल्डी अमेरिकेला आला. मशाल घेतलेला हात एका प्रदर्शनात ठेवून उरलेला पुतळा पूर्ण करण्यासाठी त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली, पण अमेरिकन माणसांनी त्याला काही दाद दिली नाही. बार्थोल्डीने पुतळ्याचे डोके पॅरिसमधल्या प्रदर्शनात ठेवले, पण स्वत:च्या देशातही त्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी जोसे पुलित्झर या जगप्रसिद्ध अमेरिकन संपादकाने (ज्याच्या नावाचे पुलित्झर परितोषिक उत्कृष्ट पुस्तकासाठी आजही दिले जाते ) स्वत:च्या ‘द वर्ल्ड’ मासिकातून एक लेख लिहून अमेरिकन जनतेकडे पैशांची मागणी केली. त्या लेखाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दीड लाख लोकांनी पैसे दिले. काहींनी हजारो डॉलर्स दिले तर काही लोकांनी एक डॉलरपेक्षा कमी रक्कम दिली ( दोनशे वर्षांपूर्वी तेवढ्याशा रकमेला सोन्याचा भाव होता). तेवढ्याने काम झाले. रक्कम उभी राहिली.पुतळा फ्रान्समध्ये बनवून पुतळ्याचे सुटे सुटे भाग भल्यामोठ्या पेटार्‍यात घालून ते असंख्य पेटारे अमेरिकेला आणले गेले. चबुतरा न्यूयॉर्कमध्ये स्थानिक लोकांनी बनवला.
बोटीने येता येता बार्थाल्डीला एलिस आयलंड दिसले. पुतळा उभारण्यासाठी ती जागा त्याला अत्यंत योग्य वाटली. कारण न्यूयॉर्क बंदरात येणार्‍या प्रत्येक बोटीला त्या इवल्याशा बेटावरून यायला लागायचे. शेवटी १८८६ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शंभर वर्षांनी अमेरिकेचे २२ वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलंड याच्या अध्यक्षतेखाली त्या पुतळ्याचे अनावरण झाले. १५१ फूट उंच असलेला हा पुतळा संपूर्णत: तांब्याच्या पत्र्यापासून बनवला गेला आहे. लाल विटांच्या चबुतर्‍यावर उभा रहिलेला तांब्याचा लाल पुतळा तेव्हा अत्यंत मोहक दिसायचा.अनेक वर्षांच्या उन्हापावसाने मूळचा तांबूस वर्ण आता हिरवट झाला आहे, पण त्या महाकाय पुतळ्याचे सौंदर्य व त्याने अनेक वर्षे दिलेला स्वातंत्र्याचा संदेश मात्र तसूभरही बदललेला नाही
गेल्या शुक्रवारी आम्हाला एका मित्राच्या वाढदिवसासाठी हडसन नदीच्या क्रूझवर आमंत्रित केले होते. सुरेख निरभ्र आकाश असलेली रात्र होती. नदीवरून वाहणारा गार वारा अंगावर शिरशिरी आणत होता. बोटीच्या डेकवर उभे राहताना स्वेटर वा शाल लपेटून घ्यावी लागत होती. खालच्या डायनिंग रूममध्ये भरपेट स्वादिष्ट इटालियन जेवण झालेले होते. छानसा रम केक कापून झाला होता. गप्पा रंगात आल्या होत्या. पाच मिनिटांत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसेल अशी बोटीच्या कॅप्टनने अनाऊन्समेंट केली. हातातले ग्लास घेऊन काही भराभर ,काही अडखळत डेकवर गेले. स्टॅच्यूसमोर बोट उभी राहिली, कप्तानाने इंजिने बद केली. बडबणारी तोंडे शांत झाली. फक्त कॅमेर्‍याच्या क्लिकचा व बोटीवर आपटणार्‍या लाटांचा लडिवाळ आवाज ऐकू येत होता. खालून वर सोडलेल्या पिवळसर लाइटमध्ये स्वातंत्र्यदेवतेचा हिरवट पुतळा लाजवाब दिसत होता. आजवर जवळून,लांबून आकाशातून,रस्त्यावरून असंख्य वेळेला पाहिला होता, तरीही तो बघण्याची आतुरता कमी होत नव्हती.
स्वत:कडे आकर्षित करून घ्यायची काय जादुई ताकद असते काही काही शिल्पांमध्ये. दगडविटा, लोखंड, तांबे अशासारख्या निरस गोष्टींपासून बनलेल्या लाखो शिल्पांसारखी ही शिल्पे, पण कसली तरी जादू त्यांना आमूलाग्र बदलून टाकते. जसा ताजमहाल तसाच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. एक प्रेमाचे प्रतीक तर एक स्वातंत्र्याचे. मूळ उद्दिष्टे त्यांना वेगळी जादू देतात का?इतक्या वर्षांची पुटे चढूनही मेंदी रंगावी तशी या शिल्पांची खुमारी रंगतच कशी जाते?
बोट वळली तरी माझे डोळे स्टॅच्यूवरून हलत नव्हते. मान वळवून मी दूरदूर जाणार्‍या स्वातंत्र्यदेवतेला परत एकदा डोळ्यात साठवून घेत होते

अपाचे’ हेलिकॉप्टर

शत्रूला शोधणे आणि त्याचा फज्जा उडवणे’ एवढे एकच धोरण डोळ्यांपुढे ठेवून तयार करण्यात आलेले ‘अपाचे एएच ६४’ जातीचे हेलिकॉप्टर हिंदुस्थानी सैन्यात दाखल होणार आहे. सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांच्या होऊ घातलेल्या या करारातून हिंदुस्थानी सैन्याला २२ अपाचे हेलिकॉप्टर्सची बळकटी येईल.
व्हिएतनाम युद्धात हजारो सैनिकांचा बळी गेल्यानंतर अमेरिकेला कोणत्याही वेळेत उडणार्‍या हेलिकॉप्टरची गरज भासू लागली. या भुकेतून तयार झालेल्या ‘अपाचे’ हेलिकॉप्टरने अफगाणिस्तान आणि इराकचे युद्ध चांगलेच गाजवले. आपल्या गुणांमुळे हेलिकॉप्टरांचा ‘तीर्थरूप’ ठरलेल्या या अपाचेने हिंदुस्थानी सैन्यालाही नवी झळाळी मिळणार आहे. ८ टन वजन ३६०० हॉर्सपॉवर क्षमतेचे दोन इंजिन असलेल्या ‘अपाचे’ आपल्या गुणांमुळे सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते.
हवेशी गप्पा मारणारा१८०० हॉर्स पॉवर क्षमतेचे दोन इंजिन बसवण्यात आलेले हे हेलिकॉप्टर ०-१०० किलोमीटर प्रतितासांचा वेग अवघ्या ४.६ सेकंदात धारण करते. ३२० किलोमीटर प्रतितासाच्या सर्वोच्च गतीने अपाचे दूरवर असलेल्या शत्रूला नामोहरम करण्यासाठी सज्ज असते. एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यास दुसरे इंजिन हेलिकॉप्टरला चालू ठेवते. यामुळे पायलटच्या जीवाला अपायदेखील होत नाही.
अत्याधुनिक रोटर प्रणाली‘हेलिकॉप्टर’ला शेपटीवर साधारण एकच पंखा असतो. पण आवाज कमी करण्यासाठी याला दोन विरुद्ध दिशेने धावणारे रोटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे शत्रूला कळण्याआधीच त्यावर झडप घालण्याला अपाचेला मदत होते. ‘टिटडनियम’च्या साह्याने बनवल्या गेलेल्या डोक्यावरील पंख्याला बंदुकीची गोळी भेदू शकत नाही. पंख्याचे वजन अवघे २७० किलो असल्याने अपाचे कोणत्याही दिशेला सहज वळते. या पंख्यामुळे हेलिकॉप्टर उभे, आडवे उलटे, तर उडतेच; पण बराच काळ स्थिरदेखील राहण्याची ताकद त्याला या पंख्यातून मिळते. पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांच्या वाढत्या कुरापती लक्षात घेता अपाचे हेलिकॉप्टर सैन्याला मजबूत करणारे आहेच, शिवाय या शत्रुराष्ट्रांवर जबर बसवण्यात मोठी मदत अपाचे करणार आहे.
बुलेटप्रूफ बॉडीअपाचेच्या बनावटीसाठी कमी वजनाच्या ‘ऍल्युमिनियम’ या धातूचा वापर करण्यात येतो. त्याची चमडी ३ थरांची असून, शेवटचा थर लोखंडापेक्षा ३ पट मजबूत आहे. यामुळे गोळ्या किंवा कमी ताकदीच्या तोफगोळ्यांचा हल्ला सहज परतवून लावता येतो. १३०० लिटर इंधन क्षमता असलेल्या टाकीच्या सुरक्षेसाठी वेगळी यंत्रणा या हेलिकॉप्टरमध्ये आहे. पायलटच्या आजूबाजूच्या असलेल्या काचा या कोणत्याही दिशेने येणार्‍या बंदुकांच्या गोळीला निरुपयोगी करतात.
शस्त्रास्त्रांचे भांडारप्रचंड तोफगोळ्यांच्या साठ्यासह अपाचे हेलिकॉप्टरला शत्रूच्या क्षेत्रात घुसून मारा करणे सहज शक्य आहे. या हेलिकॉप्टरच्या दोन्ही बाजूंना मिसाईल - ८ वाहणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. या प्रत्येक यंत्रणेत ५ से.मी. व्यासाच्या ३८ मिसाईल वाहण्याची क्षमता आहे. याच्या साह्याने आपली उपस्थिती कळण्याच्या आतच शत्रू धुळीस मिळालेला असतो. ८ किलोमीटरच्या टप्प्यात सेकंदाला ५ मिसाईल सोडण्याची क्षमता ‘अपाचे’त आहे. हेलिकॉप्टरच्या खालच्या बाजूला असलेल्या ‘बुश मास्टर चेन गन’ने क्षणात शत्रूचा नकाशा बदलतो. १.५ किलोमीटरच्या टप्प्यातील ट्रक, चारचाकी रणगाडे यांचा खात्मा करण्याची ताकद या बंदुकीत आहे.
दम काढणारे ‘नाक’अपाचेच्या सगळ्यात समोरचा भाग हा नाकासारखा दिसतो. त्यावर असलेला कॅमेरा हा जणू हेलिकॉप्टरच्या डोळ्यांचेच काम करतो. शरीरातील गर्मीवरून पायलटला १९ किलोमीटरच्या भागातील शत्रूच्या हालचाली स्पष्ट दिसतात. रात्रीच्या वेळीही स्वच्छ परिसर दाखवण्याची या कॅमेर्‍याची क्षमता असल्याने कोणत्याही वेळेत आणि मोसमात आणि जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात भरारी घेण्याची ताकद प्रदान करते. १२० अंशांपर्यंत वळण्याची क्षमता असल्याने या ‘डोळ्यातून’ (कॅमेर्‍यातून) कोणीही सुटत नाही.
थक्क करणारी यंत्रणा पायलटच्या एका डोळ्यावर कॅमेरा असतो व तो मान फिरवेल तसा त्या भागातील शत्रू त्याला स्पष्ट दिसतो. मान वळेल तशी चेन गन वळते आणि अंगठ्याखालचे बटन दाबताच बंदुकीच्या गोळ्यांनी शत्रूची दाणादाण उडते. ‘अपाचे’ंत अतिशय प्रगत संगणकप्रणाली असून, १८ किलोमीटरपर्यंतचा परिसर अतिशय स्वच्छपणे पायलट पाहू शकतो. पंख्याच्याही वरती बसवण्यात आलेला रडार हवेतील चारही दिशांनी येणार्‍या विमानांना तर जमिनीवर ३ दिशांच्या शत्रूला शोधून काढतो. हवेेतून येणार्‍या विमानांमधील संगणकाचा डाटा ‘हॅक’ देखील ‘अपाचे’तून करता येते.

मायन कॅलेंडर


२१ डिसेंबर हा संपूर्ण जगाचा शेवटचा दिवस असणार कारण त्या दिवशी महाप्रलय होऊन आपले विश्व नामशेष होणार असे भविष्य मायन कॅलेंडरने अनेक शतर्कांपूर्वी वर्तवले होते. अमेरिकेतल्या कित्येक लोकांनी त्यावर विश्वास ठेवून ख्रिसमसच्या आधी दक्षिण अमेरिकेतील मायन लोकांच्या वसाहतींकडे कूच केले होते. जर जग नाहीसे झाले तर आपण भविष्य जेथे वर्तवले गेले तिथेच असू, पण जर भविष्य खोटे ठरले तर आपणास एक नवा देश, नवी संस्कृती बघण्यास मिळेल हा त्यात हेतू होता. काहींनी ‘झाले तर वरचे जग नाहीसे होईल; पण जमिनीखाली सुरक्षित राहू’ या विचाराने भुयार खोदून घरे बांधली व त्यात तीन महिने पुरेल इतक्या खाण्यपिण्याच्या वस्तूंची तरतूद केली. अर्थात भविष्य खोटे ठरले, पण त्यामुळे जगाला मायन लोक व त्यांची संस्कृती याबद्दल सखोल महिती मिळाली.
ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपूर्वीपासून ते इ.स. ९०० वर्षांपर्यंत दक्षिण अमेरिकेत माया नावाच्या रेड इंडियन वंशाच्या लोकांची संस्कृती बहरली होती. भैतिक शास्त्र, खगोल शास्त्र, वास्तुशास्त्र वैद्यकशास्त्र यात त्यांनी आश्चर्यजनक प्रगती केली होती. चिचिनीत्झा, माचू पिचू यासारख्या अतिभव्य अणि भग्न झालेल्या वास्तू आजही त्या संस्कृतीचे दाखले देण्यास समर्थ आहेत. त्यांनी लिपी शोधून दगडावर खोदकाम करून लेख लिहिले होते. आकाशातील नक्षत्र तार्‍यांचा शेतीवर परिणाम कसा होतो हे त्यांनी ओळखले होते, ते गणित जाणत होते. निसर्गातल्या गोष्टींपासून जीवनविषयक आडाखे बांधण्यात ते एकदम चतुर होते. हिंदू लोकांसारखे ते अनेक देवांत विश्वास ठेवत व प्रत्येक देवाचे चांगले वाईट गुणही ते जाणत. देवांचे मुखवटे इमारतीवर लावून त्यांची पूजा करत. मायन लोक कलात्मकही होते. उत्खननात सापडलेली, त्यांची प्राचीन भट्टीत भाजलेली मातीची भांडी व मातीचे पुतळे त्यावरील चित्रांनी व रंगसंगतीने आजही आकर्षित करतात. इमारतींवरदेखील छान कलाकुसर असायची. त्यावर सोन्याचा मुलामा चढवला जायचा. सोन्याचे महत्त्व ते जाणत होते. सौंदर्यदृष्टी व बुद्धिमत्ता जोपासण्यावर मायन संस्कृतीचा भर होता. इजिप्तसारखे पिरॅमिडस् त्यांनी बांधले. कॅनकुनच्या जवळ असलेले चिचिन इत्झा ही वास्तू पिरमिडच्या आकाराची आहे व जगातल्या सात आश्चर्यांत तिची गणना होते. केसांच्या सहाय्याने ते जखमा शिवत. रोग्याला आराम पडावा म्हणून वनस्पतींपासून केलेली औषधे तोंडाने देत. तसेच एनिमाद्वाराही ते देत. कॅको नावाच्या फळाच्या बियांपासून चॉकलेट बनवण्याचा शोध त्यांनी लावला होता. इतक्या वर्षांनतर आजच्या मॉडर्न युगात त्याच बियांपासून चॉकलेट बनवतात.
त्यांच्या गावात सरकार होते, नगरपालिका होत्या. मैदाने होती. खेळाडूंच्या दोन टीम्स करून बॉलसदृश वस्तूने खेळ खेळत. मोठाली स्टेडियम्स त्यांनी बांधली होती ज्यात खेळाडूंची राहाण्याची व्यवस्था होती. आज ज्याला सॉना म्हणतात अशा गरम वाफ असलेल्या खोल्यांचे बांधकाम त्यांनी केले होते. दर आठवड्याला राजघराण्यातील लोकांची सॉनाचा वापर करण्याची पद्धत होती. उष्णतेने जखम बरी होती इतके शास्त्र ते जाणत. नवीन बाळंत झालेल्या आयांनादेखील सॉनामध्ये जायची सक्ती करत. मायन संस्कृती वसलेला प्रदेश डोंगराळ असला तरी त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशांबरोबर संपर्क साधण्यासाठी चोख व्यवस्था शोधून काढली होती. जेड नावाचा हिरवा दगड, टर्क्वाइझ नावाचा निळा दगड, चॉकलेट बनणार्‍या कॅको फळाच्या बिया अशा पदार्थांचा ते जगभर व्यापार करत. दुर्बिणी नसूनही आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणदिशा ते जाणत होते. त्यांचे सणवार, धर्मिक व्रते आकाशातल्या तार्‍यांवर अवलंबून असत. त्यावर आधारित त्यांनी तीन वेगवेगळी कॅलेंडर्स बनवली होती. काही लगेच वापरायची, काही वर्षांनतर वापरायची. शेतकर्‍यांना उपयुक्त, गरोदर बायकांसाठीची तर काही राज्यकर्त्यांच्या उपयोगासाठी अशी कॅलेंडर्सही उपलब्ध होती. सर्व कॅलेंडर्स गोलाकार दगडावर खोदलेली असत. नमुन्यादाखल ती आजही विकत मिळतात.
ही संस्कृती इतकी प्रगत होती त्यामुळे उत्तर व दक्षिण अमेरिकेतील इतर शहरांतून लोक मायन संस्कृतीच्या सन्निध्यात कायमचे वास्तव्य करायला येत. पण इ.स. ९०० सालानंतर अशा अतिप्रगत संस्कृतीचा एकाएकी विलय झाला. त्याबद्दल अनेक विद्वानांनी तर्कवितर्क केले. २०० वर्षांचा दुष्काळ, भयंकर संसर्गजन्य आजार, मोठ्या प्रमाणावर झालेली लाकूडतोड, परदेशी लोकाचे अतिक्रमण असे अनेक कयास बांधले गेले; पण नक्की उत्तर सापडले नाही. पण हळूहळू या संस्कृतीचे वैभव रसातळास गेले. १५११ साली स्पॅनिश लोक दक्षिण अमेरिकेत घुसल्यावर त्यांनी मायन लोकांचे पद्धतशीरपणे शिरकाण करून हळूहळू तिथे आपला जम बसवला. त्यांची संस्कृती-धर्म-भाषा पुसून टाकून त्यांच्यावर ख्रिश्चन धर्म व स्पॅनिश भाषा लादली. आज ब्राझील सोडून पूर्ण दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश भाषा बोलली जाते व संपूर्ण दक्षिण अमेरिकेचे रहिवासी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत. जे काही मायन लोक या अतिक्रमणापासून वाचले ते जगभर विखुरले गेले. ते अजूनही मायन भाषा बोलतात. त्यांचे शामन नावाचे वैद्य आजही काही भागात रुग्णांवर इलाज करतात. मायन औषधे आजही आस्तत्वात आहेत, पण मायन संस्कृती जवळजवळ नामशेष झाली आहे.
२१ डिसेंबरबद्दल हयात मायन लोकांशीं संपर्क साधला असताना ते म्हणाले, स्पॅनिश लोकांनी सगळी कागदपत्रे जाळून टाकल्यामुळे लेखी पुरावा नाही. जे काही इमारतींवर कोरले गेले आहे त्या कॅलेंडर्सवरूनच आडाखे बांधावे लागतात. पण जग नाहीसे होईल असा कयास करण्याऐवजी जगात युगप्रवर्तक बदल होतील, हिंसा होईल, मोठ्या निसर्गातील आपत्तींना सामोरे जायला लागेल असाही एक निष्कर्ष यातून बांधता येतो.
विचार केला तर शिवसेनाप्रमुख, हिंदुस्थानी संगीत जगभर लोकप्रिय करणारे पं.रविशकर, पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यासारखे अनेक एकमेवाद्वितीय लोक या काळात काळाच्या पडद्याआड गेले. दिल्ली शहरातील बलात्कार, अमेरिकेतील एका माथेफिरु तरुणाने केलेली निष्पाप मुलांची हत्या यासारखे माणुसकी नष्ट झाली आहे असे वाटणारे गुन्हे याच काळात घडले. लौकिक अर्थाने जरी जगाचा विनाश झाला नाही तरी अनेकांची वैयक्तिक जगे उन्मळून पडली. चार हजार वर्षांआधी २०१२ सालचे भविष्य सांगताना मायन कॅलेंडर फार काही चुकले नव्हते.

Why Feb Month Having 28 days

There are 28 days in February because February was the low month on the totem pole.
Originally, the Roman calendar had 12 months of 29 or 30 days, beginning in March, with an extra (intercalary) month thrown in every other year to get things back in sync with the seasons. Unfortunately this led to abuses, as officials added or dropped intercalary months to extend their time in office or to hasten elections.



When Julius (Caesar, the Roman Emperor) imposed a new calendar -- using the old months of the Roman calendar but the 365.25 days of the Egyptian year), the year began in March, or the month of Mars (Martius mensis).

Mars was the god of War and the Roman society's schedule was centred on their ability to go to war. Before March, the roads were too muddy for armies to travel.

Most months had no names and they were simply numbered.

The first four were named for 
Mars (god of war), 
aperire (the verb "to open", as in flowers), 
Maia (goddess of Spring) and 
Juno (wife of Jupiter and goddess of marriages)

From the fifth to the tenth, they were simply 
quintilis, sextilis, september, october, november and december
(quintus = 5th, sextus = 6th, septem = seven, octo = eight, novem = nine and decem = 10)

During the 10th month, the armies had to come back, otherwise they were stuck on the other side of the river Rubicon, the roads being too muddy (and they needed permission to cross the river before coming into town). Thus the end of December marked "Peace on Earth" as the Roman armies stopped warring.

The winter period had no formal months for a while. In 700 BC, king Pompilius added January and February at the end. In 450 BC, a reform of what we would call the Civil Code (akin to the French equivalent of the Common Law) made January the start of the year for civil matters. But the government continued to use March as the start of the formal year.

In some of the important religious calendars, they celebrated the beginning of the new religious year with the god Janus (god of doors and also able to see the past and the future). That seemed appropriate enough. Janus overlooking the passage from the old year to the new year.

"Februarius mensis" literally meant: month of fevers. Purification rituals were run (trying to drive away the fevers), the ritual being called Februa. The ritual survived in the Christian Church ritual under the name Candlemas. An associated minor god (or goddess in some regions) came after the name of the month was established.

---

Julius also formalized the distribution of days (it was very unequal before that; e.g., April only had 29 days).

Julius set the pattern as 31, 30 for the entire year:
March = 31, April = 30, May = 31... alternating like that, leaving February with 30. 

Except this was a bit too long (366 days) so February would actually lose a day for 3 years out of 4 (actually, when Julius's reform started out, it was very confusing -- the regular 4-year cycle became official after Julius's death).

We think of it as "adding a day every 4th year" but it started off the other way: removing a day most of the time.

When Julius died, they named a month after him: July. It already had 31 days at the time.

Two generations later, Augustus became emperor. He really thought highly of himself, so he decreed that he too should have a month named after himself. He picked the 6th one (right after Julius's month). But then he noticed that it only had 30 days. So he made it 31, moved the sequence off by one (making September 30, October 31, November 30 and December 31). 

He stole the extra day from February and did not touch January (the government calendar did not really care about these two months anyways, since the armies couldn't move).

So, thank you, Augustus, for leaving us a strange calendar.

Since then, many attempts have been made to restructure the calendar (including suggestions like yours), but they never worked.

The last chance of doing it with a Roman based calendar was in 1582 when 10 days were simply removed from the month of October (for that one year only) in order to bring the Spring Equinox back to March 21. Even that caused riots and deaths throughout the Catholic Empire (and elsewhere).

The French revolutionary calendar was also a bold attempt to give the world a modern calendar, with 12 months of 30 days (three weeks of ten days), plus a bonus 5 days (or 6 on leap years) of celebration, a period that would not belong to any month (and was placed in Summer for better enjoyment). The year of that calendar began at Autumn Equinox